इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अधिक (पुरुषोत्तम) मास सुरू झाला आहे. हिंदु धर्मामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी हा महिना येत असतो. अधिक मासात आपापल्या परीने सर्वांनी विविध प्रकारचे व्रत करावे, असे पुराणात नमूद करण्यात आले आहे. सर्वच प्रकारच्या दान, जप, व्रत इत्यादी पेक्षा अधिक मासाची पोथी श्रावणाचे फळ अनेक पटीने असते. तसेच ह्या महिन्याची संपूर्ण माहिती अनेक कथांचा सहाय्याने ह्या पोथीत करून दिली आहे. ही दुर्मिळ पोथी श्रवण आपल्या सर्वांना घरी बसून करता यावी व अधिक मासाचे अधिकाधिक फल प्राप्त व्हावे यासाठी सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी या रोज एक अध्याय आपल्यासाठी आपल्या सुमधुर स्वरात घेऊन येत आहेत
अध्याय दुसरा
या व्हिडिओ मध्ये अधिक मासातील पोथीचा दुसरा अध्याय प्राकृत श्लोकांसोबत मराठीत अर्थ देखील सांगितला आहे. स्वतः अधिक मास, ज्याचे नाव पूर्वी मल मास होते, त्याला कुणी स्वामी नसल्याने त्याला होत असलेल्या वेदना आणि व्यथा वर्णन केले आहे. आणि प्रत्यक्ष विष्णु भगवान त्याचे स्वामित्व कसे स्वीकारतात हे वर्णन देखील आहे.
पोथी पठण आणि विवेचन – सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी, नाशिक
बघा व्हिडिओ