इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अधिक (पुरुषोत्तम) मास सुरू झाला आहे. हिंदु धर्मामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी हा महिना येत असतो. अधिक मासात आपापल्या परीने सर्वांनी विविध प्रकारचे व्रत करावे, असे पुराणात नमूद करण्यात आले आहे. सर्वच प्रकारच्या दान, जप, व्रत इत्यादी पेक्षा अधिक मासाची पोथी श्रावणाचे फळ अनेक पटीने असते. तसेच ह्या महिन्याची संपूर्ण माहिती अनेक कथांचा सहाय्याने ह्या पोथीत करून दिली आहे. ही दुर्मिळ पोथी श्रवण आपल्या सर्वांना घरी बसून करता यावी व अधिक मासाचे अधिकाधिक फल प्राप्त व्हावे यासाठी सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी या रोज एक अध्याय आपल्यासाठी आपल्या सुमधुर स्वरात घेऊन येत आहेत
अध्याय चौथा
या व्हिडिओ मध्ये अधिक मासातील पोथीचा चौथा अध्याय प्राकृत श्लोकांसोबत मराठीत अर्थ देखील सांगितला आहे. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण हे धर्मराज युधिष्ठिर यांना द्रौपदी चा पूर्वजन्माची कथा ऐकवतात आणि द्रौपदीला पूर्वजन्मात दुर्वास ऋषींनी दिलेला आशिर्वाद काय होता हे देखील कळेल.
पोथी पठण आणि विवेचन – सौ. प्रतिभाताई वसंतराव जोशी, नाशिक
बघा व्हिडिओ