इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास म्हणजे नेमका काय, त्याचे महत्त्व काय, या महिन्यात काय करायला हवे यासह विविध माहितीचा खजिना आता वाचकांसमोर येणार आहे. ज्येष्ठ लेखक विजय गोळेसर महिनाभर या महिन्याची खास माहिती घेऊन आपल्यासमोर येणार आहेत. इंडिया दर्पणच्या वाचकांना यानिमित्ताने खास मेजवानी मिळणार आहे.
अधिक मास म्हणजे शुध्द मराठीत सांगायचं तर धोंड्याचा महिना. हा दर ३ वर्षांनी येतो. धोंड्याचा महिना म्हटला की, लेक जावावाला वाण देणे, कपडे, दागिणे भेट देणे एवढंच माहित असतं. पण, हा अधिक महिना दर ३ वर्षानीच का येतो? याच्या मागचे शास्त्रीय कारण काय आहे! तसेच या महिन्यात कोणती धार्मिक कृत्ये करावीत याची समग्र माहिती देणारी ही विशेष लेखमाला असणार आहे.
जाणून घेऊ अधिक मासाचे महत्त्व ही अधिक मास विशेष लेखमाला इंडिया दर्पणच्या वाचकांसाठी सादर करीत आहोत. अधिक मासात श्री विष्णुपुराणाचे पारायण करण्याची प्राचीन परंपरा आहे. या परंपरेचा मान राखून श्री विष्णुपुराणातील मनोरंजक कथा आपल्याला सांगणार आहेत ‘इंडिया दर्पणचे ज्येष्ठ लेखक विजय गोळेसर (मो. ९४२२७६५२२७).
चला तर मग यंदाचा अधिक मास साजरा करू या ‘इंडिया दर्पण’ संगे!