शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अधिक मास विशेष (भाग ५) जावयाला मानपान का? वाण कसे आणि का लावतात? असे आहे त्याचे महत्त्व

by India Darpan
जुलै 22, 2023 | 5:03 am
in इतर
0
silver plate scaled e1689939003226

अधिक मास विशेष (भाग ५)
अधिक मासात असा राखावा
जावयाचा मानपान!

यंदा मंगळवार, १८ जुलै २०२३ रोजी अधिक श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. तर अधिक श्रावण महिन्याची सांगता बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. या कालावधीत प्रत्येक घरात आपल्या आणि आपल्या लेक जावयाच्या सवडीनुसार त्याचा मान-सन्मान केला जातो, भेटवस्तू दिल्या जातात, त्याचे अगत्य केले जाते, याप्रथेमागे कोणता हेतु आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.

vijay golesar
विजय गोळेसर मो. ९४२२७६५२२७

हिंदू संस्कृतीत, परंपरेत प्रत्येक नात्याला मानाने वागवले जाते. त्यामुळे आपोआपच परस्पर ऋणानुबंध दृढ होतात. अधिक मासानिमित्त असेच एक हळुवार नाते जोपासले जाते . ते म्हणजे सासु-सासरे आणि जावयाचे. आपल्या मुलीला सासरच्या वातावरणात प्रेमाने सांभाळून घेणारा जावई, हा मुलीच्या मातापित्यांना ‘नारायणा’ समान भासतो. म्हणून पुरुषोत्तम मासात जावयाचा मान म्हणून त्याला वाण दिले जाते.

जावयाला काय वाण द्यावे?
अधिकमासातील प्रत्येक दिवस शुभ असतो. तरीदेखील जावयाच्या सवडीने त्याला घरी बोलावून त्याचा साग्रसंगीत सत्कार केला जातो. अलीकडे, तर प्रत्येक गोष्ट थाटामाटात साजरी करण्याची प्रथा झाल्यामुळे काय वाण द्यावे, याबाबत अनेक सोन्याच्या पेढ्यांमध्ये चढाओढ पहायला मिळते. चांदीचे ताम्हन, चांदीचे निरांजन, चांदीचा पेला त्याच प्रमाणे डिनर सेट (ताट,डिश,दोन वाट्या,पेला,चमचा), फुलपात्र,नक्षीदार तांब्या,पेला, समई, पूजेचे तबक, पळी, छोटे पाट, चौरंग, टाक, देवाच्या मूर्ती,देवाचे आसन, मुकुट ,मखर, ड्रायफ्रूट बॉक्स, कुयरी करंडा अशा अनेक वस्तू भेट म्हणून देता येतात. अर्थात हा सगळा भाग, स्वेच्छेचा. हौसेला मोल नसते. परंतु, शास्त्रानुसार फक्त तीस तीन अनारसे, म्हैसूर पाक किंवा बत्तासे असे सच्छिद्र पदार्थाचे देण्याची पद्धत आहे.

जोडवी बदलण्याचा मुहूर्त
अधिक मासाचे निमित्त, म्हणून सुवासिनींनादेखील जोडवी बदण्यास निमित्त मिळते. जोडवी हे सौभाग्यलेणे म्हणून पायात घातले जाते. जोडव्यांमध्येही अनेक सुंदर, नक्षीदार प्रकार मिळतात. दर तीन वर्षांनी अधिक मांसाची आठवण म्हणून नवीन जोडवी घेतली जातात.

धोंड्याचा मास आणि धोंड्याचा नैवेद्य
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना असे म्हटले जाते. नियमित सुरू असलेल्याल्या कालगणनेत आडमुठ्यासारखा, मध्येच आलेल्या दगडासारखा (धोंड्यासारखा) आलेला महिना म्हणून धोंड्याचा महिना असेही एक मत आहे. मात्र, धोंडा आणि अधिक मास यांनाजोडणारा एक खाद्यपदार्थ आहे, त्याला ‘धोंडा’ म्हटले जाते. धोंड्यामध्ये पुरणा सोबत नाणी आणि स्वछ खड़े टाकण्याची देखील प्रथा आहे. लहान मुलांना धोंडे उघडून पैसे मिळविण्यात खूपच आनंद मिळतो.
नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो, त्याला ‘दिंड’ म्हणतात, तोच पदार्थ आपल्या भागांत गोल लाडवासारखा किंवा धोंड्यासारखा वळून उकडवला जातो. त्याला धोंड्याचा नैवेद्य म्हणातात. जेवताना जावयाला आग्रहाने धोंडे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रुपाने नारायणाने धोंड्यांचा नैवेद्य स्वीकार केला, असे समजतात. जेवतांना जावाई बापुंच्या धोंड्यामध्ये खरोखरचा धोंडा किंवा खड़ा आला तर धाकट्या मेव्हण्या जावयाची चेष्टा करतात. घरात हास्याची खसखस पिकते.वातावरण प्रसन्न आणि रिलॅक्स होते.

जावई हा जिव्हाळ्याचा, आधाराचा धागा खूप पूर्वीपासून जपण्यात आला आहे. प्रत्येक नाते शब्दातून सांगण्यापेक्षा प्रतीकांतून, उत्सवांच्या माध्यमातून आविष्कारित करण्याची सवय आपल्या हिंदू संस्कृतीने लावली आहे. काळ बदलला तशी सण-उत्सवांची पद्धत बदलली. वाण देण्याच्या वस्तूही बदलल्या…मात्र परंपरांची साखळी अतुट राहिल्याने नात्यांमधले अवघडलेपण हळू हळू दूर होऊ लागले.

(क्रमश:)
संकलन : विजय गोळेसर मोबा.९४२२७६५२२७

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

समृद्धी महामार्गावरील अपघात कसे कमी होणार? बांधकाम मंत्री दादा भुसे म्हणाले…

Next Post
1 scaled 1 e1689947382183

समृद्धी महामार्गावरील अपघात कसे कमी होणार? बांधकाम मंत्री दादा भुसे म्हणाले...

ताज्या बातम्या

IMG 20250509 WA0316 1

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर…महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ही माहिती

मे 9, 2025
Untitled 20

आतापर्यंत भारत – पाक सीमेवर नेमकं काय घडलं?…पत्रकार परिषदेत दिली ही माहिती

मे 9, 2025
Nitin Gadkari e1713956790376

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन…

मे 9, 2025
1 2 1920x1026 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा…दिले हे निर्देश

मे 9, 2025
accident 11

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मायलेकी जखमी

मे 9, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांचा १० लाखाच्या ऐवजावर डल्ला…वडाळा पाथर्डी मार्गावरील घटना

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011