मीना खोंड
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९० वे साहित्य संमेलन डोंबिवली येथे ३, ४, ५ फेब्रुवारी २०१७ रोजी ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते. डोंबिवलीच्या आगरी युथ फोरमने या संमेलनाचे आयोजन केले असून श्री. गुलाबराव वझे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. डोंबिवलीत ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मला जाण्याची संधी मिळाली.तो एक भाग्यक्षण होता. संमेलनात साहित्यिकांना विचारांची मेजवानी मिळाली मोठमोठ्या साहित्यिकांच्या भेटी झाल्या .नवीन ओळखी झाल्यात .साहित्याचा भरपूर आस्वाद रसिक मनाला घ्यायला मिळाला. संमेलनाच्या उद्घाटनापासून समारोपापर्यंत विविध परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्याने आदींच्या माध्यमातून वैचारिक मेजवानी मिळाली .आमची हाॅटेलमध्ये राहण्याची छान सोय केली.तिथे सारे आपले ओळखीचे लोक भेटले.संमेलनाच्या स्थळी जाण्या येण्याकरिता वाहनाची सोय होती.एकूण सोय उत्तम होती. मंडपात गेल्यावर रजिस्टरमध्ये आमच्या सह्या घेऊन आम्हाला ओळखपत्र डायरी पेन पत्रक बॅग सगळे सामान दिले.दुसर्याच दिवशी प्रवास खर्चाचे पैसे, ‘कणगी ‘ही स्मरणिका दिली.
व्यवस्था उत्तम होती.
पहिल्या दिवशी ४ वाजता संमेलनाचे उद्घाटन होते.परंतू ते 6-30 ला सुरु झाले,मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कवी विष्णु खरे , अनेक नेते आणि अनेक मान्यवर उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.उद्घाटनाचा कार्यक्रम दिव्यभव्य शानदार झाला .वक्त्यांनी आपली मत,आपल्या मागण्या मांडल्यात. मुख्यमंत्र्यांचे भाषण खूप छान झाले.कार्यक्रम दहा वाजता संपला. त्यानंतर आमंत्रित कवींचा कविसंमेलनाचा कार्यक्रम अकरा वाजता सुरु झाला. भव्यदिव्य उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर श्रोते कविसंमेलनाला उपस्थित रहाण कठिणच होते फक्त शे -दोनशे श्रोते होते.हळूहळू संख्या कमी होत गेली . दुसर्या दिवशी बालसाहित्यिकांचा कार्यक्रम झाला. सुबोध भावेचा युवांबरोबरील कार्यक्रम खूप छान झाला.तो अभिनेता म्हणून वागला नाही हे विशेष.युवांशी छान बोलला. या साहित्य संमेलनात प्रथमच ‘गझल कट्टय़ाचे’ आयोजन करण्यात आले होते. या गझल कट्टय़ावर संयुक्त महाराष्ट्राचे दर्शन पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून गझलप्रेमींनी याठिकाणी हजेरी लावली होती. कवींच्या आवडत्या कवी कट्टय़ाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जास्तीत जास्त कवींना येथे संधी मिळाली .विविध विषयांवर कवींनी आपल्या कविता सादर केल्या. साहित्य संमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे ग्रंथदालन. या ग्रंथदालनात भरपूर स्टाॅल असून साहित्यप्रेमी पुस्तक खरेदीकरिता आले होते . माझ्यासारख्या तेलंगणातील मराठी पुस्तक दुकानात बघायला न मिळणार्या पुस्तकप्रेमीला खूप आनंद मिळतो. भोजनाची चंगळ होती.पास तर होतेच पण निरनिराळे स्वादिष्ट चवदार पदार्थांचे स्टाॅलस् होते.शेगावची कचोरी होती.दहीवडा,बटाटे वडा समोसा,पुलाव,पुर्या ,राबडी,श्रीखंड,खूप सुंदर कुलफी आणि आईसक्रिम..मेजवानी मस्त होती. संमेलनाचे आयोजक आगरी युथ फोरम असल्याने आगरी संस्कृतीचे दर्शन घडवणा-या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.सांस्कृतिक कार्यक्रम छान झाला.. संमेलन अधिकाधिक सर्वसमावेशक करण्याकरिता कार्यक्रमांची एवढी रेलचेल होती की कुठला कार्यक्रमाला जावे हा प्रश्नच होता.मुख्य मंडपासह एकूण चार मंडपांमध्ये एकाचवेळी कार्यक्रम असल्यामुळे आमच्यासारख्या रसिकांना अनेक कार्यक्रमांना मुकावे लागते. चार मंडपात चार ठिकाणी कार्यक्रम होते.शेवटी ‘युद्धस्य रम्य कथा ‘ ऐकायला बसलो.ते जीवंत अनुभव हृदय हेलावून सोडत होते.या मंडपातील श्रोत्यांची गर्दी वाढतच होती.
मी स्वतः फिडबॅक दिला.
१) उद्घाटनाच्या शानदार सोहळ्यानंतर कविसंमेलनाचा कार्यक्रम ठेवू नये.खूप उशीर झालेला असतो.श्रोत्यांची थांबण्याची मानसिक तयारी नसते.
२)एकाच वेळी चार -चार कार्यक्रम ठेऊ नये.साहित्यिक चांगल्या कार्यक्रमांना मुकतात.
डोंबिवलीत ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी सांगता समारंभ पु. भा. भावे साहित्यनगरीतील शं. ना. नवरे सभामंडपात पार पडला. तीन दिवस चाललेल्या या संमेलनात विविध साहित्यिक चर्चा, गोष्टी, वैचारिक भाषण, ऐकायला मिळाल्यामुळे एक अपूर्व आनंद मिळाला. कार्यक्रमाचे उत्तम आयोजन होते.आगरी यूथ फोरमच्या अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन! हे साहित्य संमेलनाच्या हृदयात कोरलेल्या सोनेरी स्मृती माझ्या स्मरणात राहतील .
मीना खोंड – 7799564212