सौ, मीना ओंकार सैंदाने, जळगाव
२०१६, ला मी डोंबिवलीच्या साहित्य संमेलन साठी गेले होते. तोवर खूप त्याविषयी गाजावाजा एकला होता. मी नवोदित होते. मायबोली कवितेसाठी माझी अहिराणी कवितेची निवड करण्यात आली होती. त्याचं वर्षी फक्त कवी कट्ट्यावर कविता सादर केल्या गेल्या. त्याला बहिणाबाई चौधरी नाव दिले होते. गर्दी खूप होती.
दूरवरून कवी कवयित्री आलेले होते. पण वशील्याने स्थानिक लोकांच्या कविता सादर केल्या जात होत्या. वरून त्यांना सरस्वतीचीती प्रतिमा, पेन अणि प्रशस्तीपत्रक दिले जात होते. पण इतरांना मात्र फक्त प्रशस्तीपत्र दिले जात होते. वेळ खूप झाला होता परंतु माझा नंबर येत नव्हता. मी वशिला लावला तेव्हा खूप प्रयत्नाने कविता सादर केली. प्रतिसाद छान मिळाला.
माझी अहिराणी काविता होती.कविता वाचून झाल्यावर
जेवण किंवा नाष्टा कुठे मिळतो का ? ते शोधू लागलो.
पण तेथे निराशा झाली. जेवण दोनशे रुपये प्रति ते ही दुसऱ्या टोकाला जाऊन पैसे भरून कूपन आणायचे अणि लाईनीत उभे राहचे . मनात विचार आला एवढे मोठे संमेलन अणि साधे जेवण पण नाही त्यात नावजलेले सहित्यिक त्यांना सर्व मोफत त्यात निमंत्रित कवी म्हणून मानधन देण्यात आले होते. पण नवोदितांना काहीच नाहीं. वरून त्यांनी त्यांच्या भाड्याने जायचे यायचे. नावाजलेले साहित्यातील कवी लेखक यांचा काही एक संबंध नाही असे वागत होते. प्रोत्यासन देणे दूरच फार वाईट वाटले. ही एक शोकांतिका होती की नवकवींचा अपमान होता कळत नव्हते. मनाशी ठरवले की यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनाला जायचे नाहीं.
कवी काट्यावर ९५ कवींनी आपल्या बोली भाषेतील कविता सादर केल्या त्यातील कोळी अणि मालवणी कवितांनी मनावर अधिराज्य केलें कारण बोली भाषेचे अभ्यासक डॉ अनिल रत्नाकर यांनी प्रत्येक बोलीचे वैशिष्ट सांगितले ती कुठे जन्माला आली कुठे बोलली जाते. कशी बोलली जाते. उदा. वाडवली बोलीला हे नाव का पडले तर त्या समाजातील लोक वाड्या त वस्ती करून राहायचे. तसेच कातकरी. लेवाबोली., सामवेदी, व्हराडी, पांचाळ बोली, धनगरी, कोकणी, लोहारी, कातकरी, कोल्हापुरी, झडीबोली, अशा बऱ्याच बोली होत्या त्यांचा इतिहास मला रत्नाकर सराकडून कळाला हीच त्या संमेलनाची जमेची माझी बाजू होती.
एक विशेष माझ्या अणि इतर बोलीना स्टेज मिळाले होते हेच मी भाग्य मानत होते त्यात ७५ वर्षाच्या आजींनी ठस्केदार व-हाडी कविता सादर केली होती. त्यांना बहिणाबाई चौधरी ही पदवी दिली. अनुभव माणसाला खूप काही शिकवून जातात हे त्या संमेलनातून समजले.
पण एक चांगली गोष्ट अशी की अजूनही डॉ. रत्नाकर माझ्या संपर्कात आहेत माझ्या मायग्रेन सारख्या आजारावर त्यांनी इलाज फोनवर केला त्यांचे येथे आभार मानते या डिसेंबर मध्ये होणारे साहित्य संमेलन निमित्त आपण माझे अनुभव मागितले फार बरे वाटले आपला उपक्रम छान आहे आपल्या ऋणात राहू इच्छिते अणि थाबते.
सौ, मीना ओंकार सैंदाने
३३/ब न्यू पार्वती काळे नगर
मोहाडी रोड जळगाव
९४०३३८५३१०