मुंबई – मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी अतिरिक्त आरक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर विशेष
01243 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २५.४.२०२१ रोजी १७.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसर्या दिवशी ०५.१५ वाजता पोहोचेल.
01244 विशेष गोरखपूर येथून दि. २७.४.२०२१ रोजी १७.४० वाजता सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसर्या दिवशी ०५.२० वाजता पोहोचेल.
थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, बांदा जंक्शन, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती.
संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १३ शयनयान, २ द्वितीय आसन श्रेणी.
२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर विशेष
01245 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २८.४.२०२१ रोजी १७.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसर्या दिवशी ०५.०५ वाजता पोहोचेल.
01246 विशेष गोरखपूर येथून दि. ३०.४.२०२१ रोजी सकाळी ०९.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी २३.०० वाजता पोहोचेल.
थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, बांदा जंक्शन, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती.
संरचनाः २ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ५ द्वितीय आसन श्रेणी.
3. लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष
01239 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २८.४.२०२१ रोजी १४.३० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसर्या दिवशी २३.२० वाजता पोहोचेल.
01240 विशेष गोरखपूर येथून दि. ३०.४.२०२१ रोजी ०४.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल.
थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती.
संरचनाः २२ द्वितीय आसन श्रेणी.
4. लोकमान्य टिळक टर्मिनस – भागलपूर विशेष
01241 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस दि. २९.४.२०२१ रोजी १४.३० वाजता सुटेल आणि भागलपूरला तिसर्या दिवशी ०२.१० वाजता पोहोचेल.
01242 विशेष भागलपूर येथून दि. १.५.२०२१ रोजी ०५.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी १७.०० वाजता पोहोचेल.
थांबे : कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., सासाराम, गया जं., किउल, जमालपूर.
संरचनाः ३ वातानुकूलित चेअर कार, १७ द्वितीय आसन श्रेणी.
5. 05191/05192 गोरखपूर – पनवेल विशेषचा विस्तार
05191 गोरखपूर – पनवेल विशेष दि. २४.४.२०२१ आणि २८.४.२०२१ (२ फे-या) रोजी सोडण्यात येतील.
05192 पनवेल – गोरखपूर विशेष दि. २६.४.२०२१ आणि ३०.४.२०२१ (२ फे-या) रोजी सोडण्यात येतील.
या विद्यमान विशेष ट्रेनच्या संरचनेत, थांबा व वेळेत कोणताही बदल होणार नाही.टीप: 02538/02537 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्स्प्रेस या विशेष ट्रेनचा पुखरायां येथील थांबा पुन्हा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
आरक्षण : संपूर्ण आरक्षित 01243 आणि 01245 01239, 01241 ट्रेनची तसेच 05191 या विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २५.४.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.