नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बाबत महसूल यंत्रणेकडून मार्गदर्शन करण्यात येत असून नंदुरबार तालुक्यातील मौजे पथराई व तळोदा तालुक्यातील आमलाड येथे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी करुन या संदर्भात मार्गदर्शन केले.
श्री.पाटील यांनी शेतकाऱ्यांच्या शिवाराला भेट देऊन नव्या प्रणालीची माहिती शेतकऱ्यांना दिली. ही प्रणाली पारदर्शक असल्याने शासकीय योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल. शेतकऱ्याने स्वतः ही प्रणाली हाताळायची असून ती अत्यंत सोपी व सुलभ असल्याने शेतकऱ्यांनी वेळेवर ऑनलाईन ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विद्यादेवी अशोक तांबोळी , सतीश पाटील, केशव पाटील या शेतकऱ्यांकडून पिकांची ई-पीक पाहणी करुन तशी नोंदणी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल ) नितीन सदगीर, तहसिलदार गिरिश वखारे, मंडळ अधिकारी समाधान पाटील, तलाठी सुषमा चौरे आदी उपस्थित होते.
Additional Collector in Farm for E Pik Pahni