सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिकच्या सटाणा तालूक्यातील बिजोरसे येथील शेतकरी अरुण खैरनार यांच्या कांदा चाळीत साठविलेल्या पाच ट्रॉली कांद्यावर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याने कांदा खराब झाला आहे. त्यामुळे शेतक-याचे जवळपास अंदाजे दोन लाख रुपयांच नुकसान झाले आहे.या विरोधात शेतकरी खैरनार यांनी जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल केला असून खराब कांद्याचा पंचनामा करण्यात आला आहे. कांद्याला सध्या उत्पादन खर्चा एवढा भाव मिळत नाही तर भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकरी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवतो आहे. त्यात अशा घटना शेतक-यांची चिंता वाढवणारी आहे.