शनिवार, सप्टेंबर 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता या नावाने दिला जाणार….मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

by Gautam Sancheti
सप्टेंबर 7, 2025 | 6:52 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विद्यापीठ,महाविद्यालय, अभियांत्रिकी, चित्रकला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार यापुढे आता “डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार” या नावाने देण्यात येणार आहे. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

डॉ. जे. पी. नाईक यांच्या शैक्षणिक कार्याची दखल केंद्र शासनाबरोबरच देश विदेश आणि युनेस्कोने देखील घेतली आहे. त्यांच्या योगदानाबद्दलची कृतज्ञता म्हणून या पुरस्काराला डॉ. जे. पी. नाईक यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराकरिता शिक्षकांची होणारी निवड अधिक पारदर्शक आणि गुणवत्तापूर्वक खऱ्या अर्थाने समर्पित भावनेने शैक्षणिक क्षेत्रात अध्ययन, अध्यापन करून मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांची व्हावी याकरिता निवड प्रक्रियेच्या अटी, निकष कार्यपद्धतीत सुधारणा करून सुधारित शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्कारासाठी अंतिम केंद्रीय छाननी समिती रचना
समिती सदस्य : अध्यक्ष- कुलगुरू, सदस्य- उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, कला संचालनालय सदस्य असतील तर दोन विषय तज्ञ सहसंचालक, उच्च शिक्षण (मुख्यालय) हे सदस्य सचिव असतील.

राज्यस्तरीय पुरस्कार निवड समिती
समितीचे अध्यक्ष – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उपाध्यक्ष – उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री, सदस्य अपर मुख्य सचिव,राज्यातील दोन मान्यवर शिक्षण तज्ञ,सदस्य-सचिव संचालक, उच्च शिक्षण हे असणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी (ता. आजरा) येथे ५ सप्टेंबर १९०७ रोजी जन्मलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक हे भारतीय शिक्षण क्षेत्राचे दीपस्तंभ मानले जातात. त्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देश-विदेशात पोहोचले असून युनेस्कोनेही त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. शिक्षण क्षेत्राला जीवन समर्पित करणाऱ्या या महान विभूतींच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता “डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार” या नावाने दिला जाणार आहे. या निर्णयातून शिक्षकांचा सन्मान अधिक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी ठरेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ढोल-ताशांच्या गजरात दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

Next Post

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250927 WA0322 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 27, 2025
Untitled 41
महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील फार्मसीच्या ८९ संस्थावर पीसीआयची मोठी कारवाई…प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतून केले बाहेर

सप्टेंबर 27, 2025
cbi
संमिश्र वार्ता

१५ लाखाची लाच घेणा-या मुख्य आयकर आयुक्त आणि आयटीओ यांना ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 27, 2025
post
संमिश्र वार्ता

टपाल विभागाने स्पीड पोस्टच्या दरात केले बदल…ही आहे नवीन वैशिष्ट्ये

सप्टेंबर 27, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 27, 2025
Untitled 162
संमिश्र वार्ता

नवरात्रोत्सव विशेष… मांढरदेवच्या ‘काळूबाई’ची अशी आहे महती… जाणून घ्या, येथील अख्यायिका

सप्टेंबर 27, 2025
FB IMG 1758718581267
स्थानिक बातम्या

आज नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन…सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्रीसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

सप्टेंबर 27, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोठेही पैसे गुंतवू नये, जाणून घ्या, शनिवार, २७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 26, 2025
Next Post
doctor

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011