इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगात उद्योग-धंदे डबघाईस आल्याचे पाहायला मिळाले. त्याचा फटका सर्वच उद्योगांना बसला. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जनजीवन सुरळीत होत असून, अर्थव्यवस्थाही रूळावर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या उद्योगपती रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अडानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.
रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा आशियाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याचा दुसऱ्यांदा गौरव एका दिवसापूर्वीच झाला होता. परंतु पुन्हा एकदा त्यांना अडानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अडानी यांनी मागे टाकले आहे. ते आता भारताच नव्हे, तर आशियातील सर्वात मोठे अब्जाधीश झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून अंबानी-अदानी यांच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येण्याची चढाओढ लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकी शेअर बाजारात गुरुवारी घसरण झाल्यामुळे सर्वोच्च दहा अब्जाधीशांपैकी अडानी यांना वगळून सर्वांच्या मालमत्तेत घसरण नोंदवण्यात आली आहे.
जगातील अब्जाधीशांच्या यादीत बुधवारी काही दिवसांपूर्वी आशिया आणि भारतातील सर्वात मोठे अब्जाधीश मुकेश अंबानी यांना मागे टाकणाऱ्या अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांना अंबानी यांनी पुन्हा मागे टाकले होते. फोर्ब्स रिअल टाइम बिलेनियर इंडेक्सच्या माहितीनुसार, गुरुवारी अदानी यांच्या मालमत्तेत २.१ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा आशियाचे सर्वात मोठे अब्जाधीश झाले आहेत.