इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उद्योगपती गौतम अदानींच्या मागचे विघ्न टळण्याऐवजी ते जाळे विणल्यासारखे वाढतच चालले आहे. आतापर्यंत शेअर मार्केट आणि कारखान्यांपर्यंत या अडचणी होत्या. मात्र आता पोर्टपर्यंत यंत्रणा येऊन धडकली आहे. नव्या घडामोडींमध्ये अदानींच्या मुंद्रा पोर्टचे टेररिस्ट कनेक्शन पुढे येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
अदानी उद्योग समूहाच्या विश्वासार्हतेवर हिंडेनबर्गच्या अहवालात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर अदानीने स्वतःच प्रतिष्ठेचा एफपीओ मागे घेतला. त्यानंतर हिमाचल प्रदेशातील कारखान्यावर धाड पडली, आरबीआयने वॉच ठेवायला सुरुवात केली वगैरे वगैरे घटना सातत्याने घडत आल्या. यात अदानी उद्योग समूहाला कुठेही दिलासा मिळण्याचे चिन्ह नाहीच. अशात आता अदानींच्या मुंद्रा पोर्टवरून ३ हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. मुंद्रा पोर्ट अदानींच्या कंपनीद्वारे संचालित केले जाते. या कारवाईतून राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब उघडकीस आली आहे.
एनआयएने केलेल्या तपासात या हेरॉईनचा वापर लष्कर-ए-तय्यबाला फंडींग करण्यासाठी होत होता, अशी माहिती पुढे आली आहे. या फंडिंगमधूनच देशात दहशतवादी कारवाया केल्या जाणार होत्या. ही कुठलीही ऐकीव माहिती नसून एनआयएने याचा उल्लेख पुरवणी आरोपपत्रात केलेला आहे. मुंद्रा पोर्टवरील हेरॉईन दिल्लीपर्यंत पोहोचले असते तर त्यातून लष्कर-ए-तय्यबाला फंडिंग होणार होते. यासंदर्भातील संपूर्ण नियोजन झालेले होते. याच फंडिंगमधून देशावर पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता होती.
भारतातील संघटनांना फंडिंग
भारताबाहेरील दहशतवाद्यांचे म्होरके भारतातील दहशवादी संघटनांना फंडिंग करण्यासाठी ड्रग्सचा आधार घेत आहेत, अशी माहिती एनआयएच्या हाती लागली आहे. आरोपपत्रात एनआयएने भारतातील २२ लोकांसह पाकिस्तान, अफगाणीस्तान आणि दुबईतील आरोपींशी संबंधित कंपन्यांनाही आरोपी ठरविले आहे.
एकाला गेल्यावर्षी अटक
भारतातील २२ आरोपींपैकी एकाला गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती. आता पुरवणी आरोपपत्रातही त्याला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. हरप्रितसिंह तलवार उर्फ कबीर तलवार असे त्याचे नाव आहे. त्याने दुबईला सातत्याने दौरे केले असल्याची माहिती एनआयएकडे आहे. ड्रग्सची तस्करी करण्यासाठी सागरी मार्गाचा वापर करण्याचा त्याचा प्रयत्न राहिला आहे.
https://twitter.com/airnewsalerts/status/1627675451044020226?s=20
Adani Mundra Port NIA Report Investigation