मुंबई – अदानींच्या ताब्यातील मुंद्रा बंदरामध्ये तीन हजार किलो ड्रग्ज पकडण्यात आले. त्याची किंमत २१ हजार कोटी सांगितली जाते. या कारवाईची बातमी मध्यवर्ती धारेतील प्रसारमाध्यमांनी अक्षरशः दडपली. पाठोपाठ आलेली बातमी हादरवून टाकणारी आहे. ९ जून २०२१ या तारखेला अदानी उद्योग समूहाच्या ताब्यातील याच मुंद्रा बंदरामध्ये प्रचंड प्रमाणात ड्रग्जची आयात झाली होती. त्यावेळी आलेले ड्रग्ज जवळपास २५ हजार किलो होते आणि त्याची बाजारातील किंमत होती एक लाख ७५ हजार कोटी रुपये. ते सगळे एव्हाना भारतीय बाजारपेठेत वितरित झाल्याचा दावा केला जातो. या नव्या माहितीची वस्तुस्थितीही तपशिलासह समोर येणे गरजेचे आहे. यासंदर्भात अत्यंत परखड भाष्य करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे