मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात प्रत्येकाला श्रीमंत व्हावे असे वाटते. यात काही गैर नाही, कारण वाढत्या महागाईच्या काळात पैसा असेल तरच सर्व काही खरेदी करणे शक्य होते. सहाजिकच बहुतांश जण वेगवेगळ्या व्यवसायात गुंतवणूक करतात. परंतु आजच्या काळात शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करण्याऱ्या गुंतवणूकदारांची संख्या वाढलेली दिसून येते. कारण शेअर बाजारांमध्ये गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळतो, असे म्हटले जाते.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी त्यांच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणारेही श्रीमंत होत आहेत. सुमारे 3 महिन्यांपूर्वी शेअर बाजारात सूचिबद्ध झालेले अदानी विल्मरचे शेअर्स रॉकेटसारखे धावत आहेत. आज अदानी विल्मारने नवा सर्वकालीन उच्च विक्रम प्रस्थापित केला आहे.
आजही कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट आहे. आज अदानी विल्मर शेअर हा 5 टक्क्यांनी वाढून 667.95 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअर्सने लिस्टिंग दिवसापासून सातत्याने गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवण्याचे काम केले आहे. त्याच्या सूचीच्या दिवसापासून सुमारे 200 टक्केचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात शेअर जवळपास 76 टक्के वाढला आहे. तर, या समभागाने एका आठवड्यात 15.75 टक्क्यांनी उसळी घेतली आहे.
अदानी विल्मर IPO 27 जानेवारी 2022 ला लॉन्च करण्यात आला होता आणि त्याचे शेअर्स 8 फेब्रुवारी 2022 ला लिस्ट करण्यात आले होते. कंपनीची इश्यू किंमत ₹218 ते ₹230 होती. कंपनीचे शेअर्स 8 फेब्रुवारी रोजी बीएसईवर 221 रुपयांच्या सवलतीने सूचीबद्ध झाले. त्यानुसार, अदानी विल्मारच्या समभागांनी सुमारे अडीच महिन्यांत त्यांच्या गुंतवणूकदारांना सुमारे 200 टक्के इतका मजबूत परतावा दिला आहे.