नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गौतम अदानी समूह येत्या ७ वर्षांत तब्बल १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. समूहाची गुंतवणूक ही कर्नाटक राज्यात असेल. अदानी पोर्ट्स अँड सेझ लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) करण गौतम अदानी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, “कर्नाटकमध्ये, ज्या भागात आम्ही गुंतवणूक आणि विस्तार करणार आहोत, तेथे पुढील सात वर्षांत सुमारे १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. जगातील सर्वात मोठी सौरऊर्जा कंपनी म्हणून अदानी समूह राज्यात अक्षय ऊर्जेमध्ये अधिक गुंतवणूक करणार आहे.”
अदानी म्हणाले की, हा समूह कर्नाटकात सिमेंट, वीज, पाइप्ड गॅस, खाद्यतेल, वाहतूक, लॉजिस्टिक आणि डिजिटल अशा अनेक क्षेत्रात सक्रिय आहे आणि आतापर्यंत २० हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे. अदानी समूहाचे कर्नाटकात ७ दशलक्ष टनांपेक्षा जास्त क्षमतेचे चार सिमेंट उत्पादन कारखाने आहेत. करण अदानी यांनी माहिती दिली की समूह या क्षेत्रातही आपले अस्तित्व वाढवेल. याशिवाय मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही विस्तार करण्यात येणार आहे. याशिवाय अदानी विल्मार मंगळुरूमध्ये आपली उपस्थिती वाढवत आहे.