इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समुहांपैकी एक असलेल्या अदानी उद्योग समुहाने गुगल क्लाउडसोबत भागीदारी करण्याची घोषणा केली आहे. ही अनेक वर्षांची भागीदारी असणार आहे. त्याअंतर्गत अदानी समुह आणि गुगल क्लाउड हे दोघे मिळून आगामी काही वर्षे भारतात क्लाउड स्टोअरेज सुविधा वाढविण्याच्या दिशेने काम करणार आहेत. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, दोघे मिळून डिजिटल भारत मोहिमेला गती देण्याचे काम करणार आहेत.
या भागीदारीअंतर्गत अदानी समुहाच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामाला मोठ्या प्रमाणात प्रगत बनवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामध्ये बेस्ट-इन-क्लास इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्री सोल्युशन्स सादर केले जाणार आहे. या भागीदारीच्या माध्यमातून २५० हून अधिक बिझनेस-क्रिटिकल अॅप्लिकेशन्सना क्लाउडवर स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अदानी समुह आणि गुगल क्लाउड या दोन्ही कंपन्यांनी भागीदारीच्या पहिल्या टप्प्यांतर्गत काम करण्यात सुरुवात केली आहे. आपल्या उपलब्ध असलेल्या ऑन प्रिमायसेस डेटा सेंटर आणि कॉलोकेशन सुविधांच्या माध्यमातून अदानी समुह गुगल क्लाउडची मदत करणार आहे. या भागीदारीमध्ये गुगल क्लाउडच्या मुलभूत पायाभूत सुविधेत बदल करणे, कार्यप्रवाह केंद्रीकृत करणे, तसेच संचालन सुव्यवस्थित बनवण्यासारख्या कामांचा समावेश आहे.
गुगल क्लाउड म्हणजे काय
मोबाइल, कॉम्प्युटर आणि पेन ड्राइव्ह यांच्याशिवाय डेडा कंपनीच्या सर्व्हरवर स्टोअर केला जातो, त्याला क्लाउड स्टोअरेज असे म्हणतात. हा डेटा कुठूनही अॅक्सेस केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला वेगळा मोबाइल, कॉम्प्युटर अथवा पेन ड्राइव्हची आवश्यकता नसते. क्लाउड स्टोअरेज ही डेटा स्टोअरसाठी गुगलसह अनेक कंपन्यांसोबत काम करत आहे. गुगल क्लाउडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) थॉमस कुरियन यांनी ही भागीदारी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की भारतात अदानी समुहाकडे सर्व प्रकारच्या व्यवसायांचा सर्वात मोठा आणि सर्वात वेगाने वाढणारा पोर्टफोलिओ उपलब्ध आहे. त्यामुळे तो दोन्ही कंपन्यांच्या व्यवसायासाठी अधिक चांगला ठरणार आहे.