इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन सृष्टीत येण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. काही प्रमाणात अनेकांचं ते स्वप्न पूर्णही होतं. त्याची क्रेझ सातत्याने वाढते आहे. दीपिका पदुकोण, क्रिती सॅनॉन, कतरीना कैफ, आलिया भट्ट या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत. अभिनयाप्रमाणेच आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसाठी या अभिनेत्री चर्चेत असतात. आज जरी या अभिनेत्रींचा बोल्डनेस पडद्यावर किंवा ओटीटीच्या माध्यमातून सर्रास समोर येत असला तरी ७० – ८० च्या दशकात हा प्रघात फारसा प्रचलित नव्हता. बॉलिवूडमध्ये बोल्डनेस सुरू झाला तो ७०-८० च्या दशकात. अभिनेत्री झीनत अमान या अभिनयापेक्षाही त्यांचा बोल्डनेस आणि कपड्यांच्या स्टाईलमुळे चर्चेत राहिल्या. सध्या त्या बॉलिवूडमध्ये सक्रीय नाहीत.
१९७० मध्ये त्यांनी ‘हंगामा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता झीनत अमान या सोशल मीडियावर आल्या आहेत. त्यांनी आपले स्वतःचे इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केले आहे. इन्स्टाग्रामवर येताच त्यांच्या पहिल्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. त्यांनी स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. या वयातही त्यांचे सौंदर्य अबाधित आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी झीनत यांनी मिस एशिया पॅन पॅसिफिकचा किताब जिंकला होता.
चाहत्यांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. कलाकारांनी ईमोजीद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुम्हाला येथे पाहून खूप आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया एक चाहत्याने व्यक्त केली. “तुम्हाला येथे पाहून खूप आनंद झाला.” असे दुसऱ्याने लिहले आहे “मॅडम तुमच्याबरोबर काम करायचे आहे.” तर आणखीन एकाने “बॉलिवूडमधील नैसर्गिक सौंदर्य लाभलेली अभिनेत्री म्हणजे तुम्ही”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
झीनत अमान यांनी आपल्या कारकिर्दीत ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘डॉन’, ‘कुर्बानी’, ‘यादों की बारात’, ‘दोस्ताना’ अशा सुपरहिट चित्रपटात काम केले. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या त्यांची जोडी प्रसिद्ध होती. करिअरप्रमाणे त्यांचे खासगी आयुष्यदेखील कायम चर्चेत राहिले. करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी लग्न केलं, पण त्यांच्यासाठी हे दोन्ही अनुभव वाईट ठरले.
Actress Zeenat Aman New Inning Social Media