इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडचे हॉट कपल सिद्धार्थ आणि कियारा जैसलमेरमध्ये विवाहबद्ध झाले. नुकताच मुंबईत त्यांचा रिसेप्शन सोहोळा संपन्न झाला. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ७ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा राजेशाही विवाह सोहळा पार पडला. मुंबईत लग्नाचं जंगी रिसेप्शन झालं. त्या रिसेप्शनला चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्ग्ज कलाकारांनी हजेरी लावली. यातच अभिनेत्री विद्या बालनही पतीसह हजर होती. मात्र, रिसेप्शनला घातलेल्या कपड्यांमुळे ती चांगलीच ट्रोल होत आहे.
सिद्धार्थ – किआराच्या मुंबईत झालेल्या रिसेप्शनला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या रिसेप्शनला नीतू कपूर, आलिया भट्ट, अजय देवगण, काजोल, अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी,अनुपम खेर, अर्पिता – आयुष शर्मा, दिशा पाटनी, वरुण धवन, करिना कपूर खान, करण जोहर असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. अभिनेत्री विद्या बालन तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर आली होती. मात्र, कोणत्याही कार्यक्रमाला साडी नेसणारी विद्या या रिसेप्शनला एका घागऱ्यामध्ये दिसली. आता त्यावरून तिला ट्रोल केलं जात आहे.
विद्या बालनने यावेळी काळ्या रंगाचा घागरा परिधान केला होता. या घागऱ्याचा टॉप तिच्या कमरेपर्यंत होता तर घागऱ्याला भरपूर घेरही होता. मुळात या ड्रेसमध्ये ती अजिबात कम्फर्टेबल नव्हती. त्यामुळेच बहुधा चालताना ती अडखळत होती. आता तिच्या या व्हिडीओवर नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“कोणत्याही समारंभाला साडी नेसून येणाऱ्या विद्याला आज काय झालं?”, असा प्रश्न एक नेटकऱ्याने विचारला. तर “ही ज्या प्रकारे चालतीये त्यावरून ती प्रेग्नंट असल्याचं दिसत असल्याचं आणखी एकाने म्हटलं आहे. “वाईट फॅशन सेन्सचा एखादा पुरस्कार द्यायचा असेल तर तो विद्या बालनला द्यावा लागेल”, अशाही कमेंट्स येत आहेत.
Actress Vidya Balan Troll in Social Media Video