इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमध्ये अनेक गुणी कलाकार आहेत. ज्यांच्या अभिनयामुळे हे कलाकार लोकप्रिय असतात. अशीच एक गुणी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचा ‘नियत’ हा चित्रपट ७ जुलैला प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने ती अनेक गोष्टींबाबत संवाद साधते आहे.
सिद्धार्थशी लग्न करायचे नव्हते
विद्या बालनच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केले. मात्र, आपल्याला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते, असे विद्या सांगते. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विद्या बालनने नुकतीच रणवीर अल्लाबादियाच्या शोला हजेरी लावली होती. तेव्हा तिने अनेक गोष्टी सांगितल्या. सिद्धार्थला मी भेटले तेव्हा मी प्रेम हा विषयच सोडून दिला होता. मला कधीच लग्न करायचे नव्हते. आणि त्यातच मी सिद्धार्थला भेटले. तो दिसायला इतका देखणा होता, की मला त्याचे शारीरिक आकर्षण वाटले होते, अशी कबुली देखील सिद्धार्थने दिली. याहीपेक्षा महत्त्वाचे सिद्धार्थसोबत राहणे मला नेहमीच सेफ वाटत होते, असेही ती सांगते. त्यामुळे देखील मी त्याच्याकडे आकर्षित झाले. असे जरी असले तरी या नात्यासाठी सिद्धार्थनेच पुढाकार घेतला.
मी जेव्हा या नात्यात आले तेव्हा आयुष्यात नेम, फेम होते, पण कोणाची सोबत नव्हती, असे विद्या सांगते. त्यामुळेच मला सगळे शेअर करता येईल, अशी एक व्यक्ती हवी होती, जी मला सिद्धार्थच्या रूपाने मिळाली, असे विद्या सांगते.