इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ये रिश्ता क्या कहलाता है फेम वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणात आता राहुल नावाच्या व्यक्तीचा उल्लेख होत आहे. सोशल मीडियावर सुसाईड नोटही व्हायरल झाली आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार, हे वैशालीने तिच्या मृत्यूपूर्वी लिहिले होते. यामध्ये तिने तिच्यावर होणाऱ्या मानसिक छळाविषयी लिहिले आहे. आत्महत्येचे पाऊल उचलत तिने आई-वडिलांची माफी मागितली आहे. राहुल आणि दिशाने माझा मानसिक छळ केला असून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असेही लिहिले आहे. तर, प्रियकर मितेशची माफीही तिने मागितली आहे. I Quit हे शेवटी लिहिले आहे.
राहुलने मानसिक छळ केला
वैशाली ठक्कर हिच्या आत्महत्येची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूनंतर पोलिस अधिक्षक मोती-उर-रहमान यांनी एएनआयला सांगितले की, सुसाइड नोटमध्ये राहुल नावाचा उल्लेख आहे. जो वैशालीचा छळ करत होता. आता सोशल मीडियावर सुसाईड नोटची पाने व्हायरल झाली आहेत. राहुलने तिचा मानसिक छळ केल्याने तिला आत्महत्या करावी लागली, असे या चिठ्ठीत लिहिले आहे.
या सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले आहे की, I Quit माँ. पप्पा, ममा, माझे तुमच्यावर प्रेम आहे. मी वाईट मुलगी असेल तर मला माफ करा. कृपया राहुल आणि त्याच्या कुटुंबियांना शिक्षा करा. राहुल आणि दिशा यांनी अडीच वर्षांपासून माझा मानसिक छळ केला. अन्यथा माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. मी तुला आनंदी राहण्याची शपथ देते. मी तुला खूप प्रेम करते मितेश. मला माफ करा.
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, वैशालीच्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे की, “राहुलने मैत्रीचा फायदा घेत फसवणूक करून तिचे फोटो काढले. त्याने हे फोटो आधीच्या प्रियकराला पाठवले होते, त्यामुळे त्यांचा साखरपुडा मोडला. तरीही तो वैशालीचा छळ करून ब्लॅकमेल करत होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुसाईड नोटमधील हस्ताक्षराची पुष्टी करण्यासाठी पोलीस तज्ज्ञांची मदत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Actress Vaishali Thakkar Suicide note Viral