इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील आपल्या लूकमुळे उर्वशी रौतेला खूप चर्चेत आहे. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी, तिने एक क्रोकोडाईल अर्थात मगर असलेला नेकलेस घातला होता. त्यानंतर उर्वशीला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. मात्र, उर्वशीने हा नेकलेस घातल्याने या नेकलेसची किंमत वाढली असल्याचा दावा उर्वशीच्या पीआर टीमने केला आहे. हा नेकलेस आधी २०० कोटींचा होता, आता त्याची किंमत २७६ कोटी रुपये एवढी झाली आहे. उर्वशीच्या या लोकप्रिय नेकलेसमध्ये दोन मगरी आहेत. अभिनेत्रीने एका पोस्टमध्ये सांगितले होते की, हे कार्टियर ब्रँडचे आहे. हाच नेकलेस २००६ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हल दरम्यान मोनिका बेलुचीने घातला होता.
कसा आहे हा नेकलेस?
नेकलेसमध्ये ६०.२ कॅरेटचा वापर करण्यात आला आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या मगरीमध्ये १८-कॅरेट पांढरे सोने वापरण्यात आले असून त्यावर ६६.८६ कॅरेट वजनाचे पाचू लावण्यात आले आहेत. मॅक्सिन अभिनेत्री मारा फेलिक्सनेही असाच मगरीचा हार घातला होता. १९८० मध्ये त्यांनी गळ्यात दोन मगरींचा हार घालून सर्वांना चकित केले होते. उर्वशीने कान्समध्ये घातलेला नेकलेस फ्रेंच लक्झरी फर्म कार्टियरने बनवला आहे. कंपनीने या नेकलेसवर १७९ कोटी रुपये खर्च केले आहेत. मूळ नेकलेस हा कार्टियर ब्रॅण्डच्या उत्कृष्ट कलेक्शनमधील प्राचीन दागिन्यांचा एक भाग आहे.
नेकलेसची किंमत २७६ कोटी रुपये
उर्वशीच्या पीआरने यासंदर्भात पोस्ट शेअर केली. ‘उर्वशी रौतेलाने परिधान केलेल्या मूळ क्रोकोडाइल नेकपीसची किंमत २०० कोटी रुपयांवरून २७६ कोटी रुपये झाली आहे.
हा दावा फेटाळला
फॅशन एक्सपर्ट अरुंधती डे यांनी उर्वशीचा नेकलेस बनावट असल्याचा दावा केला आहे. अरुंधतींनी नेकलेसचा मूळ फोटो शेअर केला, हे कृत्य लाजिरवाणे म्हटले आहे. उर्वशीने मात्र हे सगळे दावे फेटाळत हा नेकलेस मास्टरपीस असल्याचे सांगितले. ‘ज्या लोकांना योग्य माहिती नाही, ते लोक नेकलेसबद्दल विचित्र कमेंट करत असतात. ज्यांना त्या दागिन्यांचा इतिहास माहीत आहे ते क्रोकोडाईल नेकलेसच्या प्रेमात नक्कीच पडतील,’ असेही उर्वशी सांगते.
Actress Urvashi Rautela Neck Piece Price