इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टिव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती उर्वशी ढोलकिया हिचा अपघात झाला आहे. उर्वशीच्या गाडीला एका बसने जोरदार धडक दिली. उर्वशी शूटींगसाठी जात असताना तिच्या गाडीचा अपघात झाला. नशीब बलवत्तर असल्याने यात उर्वशीला कोणतीही दुखापत झालेली नाही.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. एका शाळेच्या बसने उर्वशीच्या गाडीला धडक दिली. मात्र, कार आणि स्कूल बसच्या धडकेत अभिनेत्रीला फारशी दुखापत झालेली नाही. ती या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. टीव्ही शो ‘कसौटी जिंदगी की’ मध्ये कोमलिकाची भूमिका साकारून उर्वशी घराघरात प्रसिद्ध झाली होती. याशिवाय ती ‘बिग बॉस ६’ या लोकप्रिय टीव्ही शोचीही विजेती आहे.
अभिनेत्री उर्वशी ढोलकिया ही तिच्या गाडीतून स्टुडिओमध्ये शूटींगसाठी जात होती. यावेळी तिच्याबरोबर एक कर्मचारीही होता. पाठीमागून भरधाव येणाऱ्या एका शाळेच्या बसने उर्वशीच्या गाडीला धडक दिली. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र उर्वशीला डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. याप्रकरणी उर्वशीने कोणताही गुन्हा नोंदवण्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे. “हा फक्त एक अपघात होता. मी सध्या ठिक आहे. काळजी करण्याची गरज नाही”, असे उर्वशीने सांगितले.
अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हे टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. ‘कसौटी जिंदगी की’मध्ये तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. या शोमधील तिचा अभिनय तर प्रेक्षकांना आवडलाच, पण तिचा मेकअप आणि ड्रेसिंग सेन्सही खूप चर्चेत आला होता. उर्वशीने तिच्या आयुष्यातील बराच काळ एकटीने घालवला आहे. उर्वशीने ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यात तिने कोमोलिका हे पात्र साकारले होते. या पात्राद्वारे ती घराघरात पोहोचली. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी उर्वशीने लग्न केले. त्यानंतर वर्षभरातच तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. पण तिचे हे लग्न जास्त काळ टिकले नाही. उर्वशी ही ‘नागिन ६’, ‘चंद्रकांता’ या मालिकेत झळकली होती.
Actress Urvashi Dholakia Road Accident School Bus