मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – बॉलीवूड म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टी असो की, टीव्ही मालिकेचा छोटा पडदा असो. सुरुवातीच्या काळात बहुतांश कलाकारांना स्ट्रगल करावे लागते. यामध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांचा समावेश आहे. टीव्ही मालीकेत काम करताना सुरुवातीच्या काळात खूपच कमी पेमेंट मिळते, त्यामुळे कलाकारांना अत्यंत हलाखीचे दिवस काढावे लागतात. अशाच प्रकारे एका अभिनेत्रीला यातून जावे लागले आहे. ‘कसौटी जिंदगी की’ मध्ये कमोलिकाची नकारात्मक भूमिका साकारणारी सुंदर अभिनेत्री उर्वशी ढोलकिया आजकाल कलर्स टीव्हीच्या सर्वात जास्त टीआरपी शो ‘नागिन ६’ मध्ये दिसत आहे.
या शोद्वारे अभिनेत्री तब्बल ४ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतली आहे. या शोलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, उर्वशीने तिच्या आयुष्यात केवळ प्रसिद्धीच नाही तर संघर्षही पाहिला आहे. ती अशा अवस्थेतून गेली आहे जेव्हा तिच्याकडे तिच्या मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते.
उर्वशी ढोलकियाचे वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झाले होते. जे फार काळ टिकले नाही. वयाच्या १८ व्या वर्षी ती तिच्या पतीपासून विभक्त झाली आणि आई-वडिलांच्या घरी राहायला गेली. त्यावेळी उर्वशी गरोदर होती. त्यानंतर वयाच्या १९ व्या वर्षी तिने क्षितिज आणि सागर या जुळ्या मुलांना जन्म दिला.
सध्या उर्वशी सिंगल मदर असून तिने दोन्ही मुलांचे संगोपन एकट्याने केले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, उर्वशीने तिच्या वाईट काळाची आठवण करून दिली जेव्हा तिला तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी ३ हजार रुपयांची गरज होती.
#urvashidholakia #live #love #smile #happiness #? pic.twitter.com/4IC8drhI4C
— Urvashi Dholakia (@Urvashi9) August 26, 2021
पैशांसाठी तिने एक पायलट एपिसोड देखील शूट केला होता, परंतु निर्मात्यांनी तिला फक्त अर्धे पैसे देऊ केले. कारण तो फक्त पहिला भाग होता. याबाबत एका मुलाखतीत उर्वशी म्हणाली, तेव्हा मी किशोरावस्थेत होते. आजपर्यंत यात अडकले आहे आणि मला फक्त इतरांवर अवलंबून न राहण्यास शिकवले आहे.
ती पुढे म्हणाली, तेव्हा असे नाही की, मी परावलंबी होतो, परंतु परिस्थितीमुळे मला थोडे अधिक सक्षम बनवले. तसेच सावध जगायला शिकवले. त्यावेळी, मी थोडी हायपर होते, कारण तुम्ही अशा परिस्थितीत अडकलेले असतात की, तुम्हाला काय करावे हे माहित नसते,
उर्वशी पुढे म्हणाली, ” मी विचार केला आता मी काय करावे, माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी 1500 रुपये नाहीत. मला वाईट वाटले, खूप निराश वाटले, पण त्यातून मी सावरले आणि खूप काही शिकले.
आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला वाटते की, मी खूप काही केले आहे. माझ्यासाठी ठीक आहे. आयुष्यात तुम्हाला खूप अडथळे येतात, पण तुम्हाला फक्त पुढे जायचे आहे, असे सांगताना उर्वशीच्या डोळ्यात अश्रू आले होते.