इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या चित्रविचित्र कपड्यांसाठी उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. सध्या तर तिच्यावरून राजकारणात युद्ध पेटले आहे. असे असले तरी सोशल मीडियावर तिचे लाखोंच्या संख्येने चाहते आहेत. उर्फीच्या कपड्यांवरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ या सध्या तिच्यावर वारंवार टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. नुकताच उर्फीने जावेद अख्तर यांच्याबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यासोबतच तिने आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत.
जावेद अख्तर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत उर्फी लिहिते, “अखेर मी माझ्या आजोबांना भेटले. ते एक दिग्गज कलाकार आहेत. लोकांनी त्यांच्यासमोर सेल्फीसाठी रांग लावली, पण त्यांनी कोणाचंही मन दुखावलं नाही, आणि सगळ्यांशी त्यांनी मनमोकळा संवादही साधला. हे पाहून त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला आहे.” त्यानंतर उर्फी विमानतळावर दिसली. यावेळी तिचे फोटो काढण्यासाठी मीडिया फोटोग्राफर तिथे आले. उर्फीही हसतमुख चेहऱ्याने त्यांना भेटली. यावेळी एका फोटोग्राफरने तिला विचारलं की, “जावेद अख्तर यांच्याशी तुझं काय बोलणं झालं?” त्यावर ती गमतीत म्हणाली, “मी त्यांना म्हणाले की, मी तुमची नातं आहे, हे तुम्हाला माहीत आहे ना. त्यामुळे आता तुमच्या मालमत्तेत माझाही अधिकार आहे. तुमच्या मालमत्तेचे तीन भाग होणार आहेत.” उर्फीने दिलेल्या या उत्तरावर सर्वजण हसू लागले.
२०२१ मध्ये उर्फी जावेद ही जावेद अख्तर यांच्या परिवारातील आहे असा एक गैरसमज निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी तिला जावेद अख्तर यांची नात म्हणूनही संबोधलं गेलं होतं. अखेर त्यावेळी जावेद अख्तर यांची पत्नी शबाना आझमी यांनी “उर्फीचा आमच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही, उगाच खोटं पसरवू नका,” असं म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर नुकतीच उर्फी ही संपूर्ण कपड्यांमध्ये दिसली होती.
https://twitter.com/uorfi_/status/1611941256346886145?s=20&t=QjkkDRrzHYJtBU6i2pIcIw
Actress Urfi Javed Meet Javed Akshtar Says