इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिग बॉस ओटीटीमधील माजी स्पर्धक उर्फी जावेद ही बोल्डनेससाठी सर्वात प्रसिद्ध आहे. बोल्ड स्टाइल आणि फॅशन सेन्स असलेली उर्फी आपले मत खुलेपणाने सर्वांसमोर मांडते. उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा असे वक्तव्य केले आहे, ज्यावरून चर्चा सुरू झाली आहे. कोईमोई वेबसाईटला दिलेल्या एका मुलाखतीत उर्फी जावेदला प्रश्न विचारण्यात आला, की “मोठ्या पडद्यावर ती न्यूड सीन शूट करेल का”? या प्रश्नाच्या उत्तरादाखल उर्फी म्हणाली, की “ती परिस्थितीनुसार किंवा कथेच्या मागणीनुसार न्यूड सीन शूट करण्यास सहमती दर्शवेल”. बेफिक्रा या पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये उर्फीने आपली अदाकारी दाखवली होती. या गीताच्या प्रमोशनादरम्यान चित्रपटातील आपली एंट्री आणि त्याच्याशी संबंधित प्लॅन्सवर तिने खुलेपणाने आपली मते मांडली.
चित्रपटात न्यूड सीन चित्रित करण्याच्या प्रश्नावर उर्फी म्हणाली, की कोणत्याही चित्रपटात ती विनाकारण न्यूड होणार नाही. चित्रपटाच्या कथेत तशी मागणी असेल तर ते करायला तिची हरकत नाही. ती म्हणाली, की “माझी ओळख फक्त कपड्यांवरून केली जाऊ शकत नाही. मी त्याहून अधिक चांगली अभिनेत्री आहे. मी चांगले काम करते. मला असे काही काम मिळाले तर मला विचार करायला वेळ लागेल. याबद्दल ऐकताच मी हो म्हणेन असे नाही”. उर्फी पुढे म्हणाली की, जर खूप चांगला प्रोजेक्ट असेल. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या एखाद्या चित्रपटासराखी ऑफर असेल तर ती विचार करेल. भन्साळी हे असे दिग्दर्शक आहेत, ज्यांच्यावर मी विश्वास ठेवू शकते. त्यांच्यासारखे दिग्दर्शक फक्त प्रेक्षकांना दाखवण्यासाठी असे सीन शूट करणार नाहीत. चित्रपटाच्या कथेत तशी मागणी असेल, तरच ते असे करायला सांगतील.
उर्फी सध्या रिलेशनशिपमुळे सुद्धा चर्चेत आली आहे. काही वृत्तांनुसार, इंडो कॅनेडियन गायक कुंवरसोबत ती डेटिंग करत आहे. उर्फी त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. परंतु ही फक्त अफवा आहे, असे स्पष्टीकरण तिने नुकतेच एका मुलाखतीत दिले होते. आम्ही दोघे फक्त मित्र आहोत, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही, असे ती म्हणाली होती. मी त्याच्यासोबत एक गाणे चित्रित केले आहे. त्याच शूटचे फोटो आम्ही दोघे शेअर करत असतो, असे ती म्हणाली. उर्फी जावेद नेहमीच विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये ती टॉपलेस चालत असल्याचे दिसत आहे. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीप्रमाणे पसरत होता.