विशेष प्रतिनिधी, मुंबई
अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही सोशल मिडियावर अतिशय सक्रीय असते. सातत्याने ती विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करत असते. फेसबुक, इन्स्टाग्राम आदींवर तिचे मोठे चाहते आहेत. त्यामुळेच तिच्या पोस्टला लाईक असो की कमेंट सर्वच बाबतीत तिला मोठा प्रतिसाद लाभतो. सध्या तिने एक पोस्ट शेअर केली असून ती सध्या विशेष चर्चेत आहे. या पोस्टबरोबर तिने तिचे काही फोटोही शेअर केले आहेत. हास्याशी संबंधित ही पोस्ट अनेकांनाच भावते आहे. तर पाहूया तिची पोस्ट काय आहे.
तेजस्विनीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,
माझ्याकडे काय ती म्हणतात ती
“perfect smile” वगैरे नाही. आणि तसे दात ही नाहीत…मी हिरड्या दाखवून हसते. आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. सगळं कसं मोजून मापून करायचं ?? त्यातून हसणं…छे !!! आहे अशी आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या…
दात दाखवून असो, वा खळखळून असो….मला
‘ हसायला ‘आवडतं
हसल्याने आयुष्य वाढतं म्हणतात…
हल्ली हसायला फार कमी मिळतंय, तेव्हा हसायची किंवा हसवण्याची संधी मिळाली तर ती सोडू नका.
ते एका चित्रपटात म्हटलंय ना,
क्या पता कल हो ना हो…..!!!
.
.
#sahajvatlamhanunbolle #nogyaanonlyvigyaan #laughteradaykeepsthedoctoraway #becomfortableinyourownskin #tejaswwini