बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अभिनेत्री तेजश्री प्रधान २ वर्षांनी पुन्हा टीव्ही मालिकेत

by India Darpan
जुलै 29, 2023 | 2:49 pm
in मनोरंजन
0
Tejashri Pradhan1 e1677652573903

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर आलेली जान्हवी तिच्या सहा सासवांसह सगळ्यांचीच लाडकी झाली. या मालिकेतील जान्हवी आणि श्री ची केमिस्ट्री सगळ्यांनाच भावली. या मालिकेनंतर तेजश्री ‘अगंबाई सासूबाई’ या झी मराठीवरील मालिकेत झळकली होती. या मालिकेत निवेदिता सराफ यांच्यासोबत तिची छान जोडी जमली होती. यानंतर मात्र तेजश्री काही छोट्या पडद्यावर दिसली नाही. आता पुन्हा तेजश्री छोट्या पडद्यावर परतणार आहे.

अलीकडच्या काळात वेगळे विषय आणि उत्तम सादरीकरण यामुळे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने आपले नवीन स्थान निर्माण केले आहे. याच वाहिनीवरील एका नव्या मालिकेतून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वी आपण छोट्या पडद्यावर कमबॅक करत असल्याची घोषणा केली होती. तेजश्रीच्या या नव्या मालिकेचं नाव ‘प्रेमाची गोष्ट’ असं आहे. या मालिकेचा प्रोमो आला असून प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुक्ता आणि सागरच्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मुक्ताच्या भूमिकेत तेजश्री प्रधान तर सागरच्या भूमिकेत राज हंचनाळे आहे. तेजश्री आणि राज पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. या नव्या मालिकेबद्दल तेजश्री फारच उत्सुक आहे. या नव्या भूमिकेविषयी तेजश्री म्हणते, एक प्रोजेक्ट संपल्यानंतर काही काळ दिसणं मी ठरवून टाळते. देवकृपेने प्रेक्षक माझ्या नव्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पहात असतात. जसं घरातली एखादी व्यक्ती कामानिमित्ताने बाहेर गेली की घरातले तिच्या वाटेकडे डोळे लावून बसेलेले असतात. अगदी तसाच अनुभव एक कलाकार म्हणून मीही घेतला आहे. कित्येक दिवसांपासून नवी मालिका कधी, अशी विचारणा होत होती. त्यामुळेच ‘स्टार प्रवाह’वरील एका नव्या मालिकेतून मी लवकरच भेटीला येणार आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय. मला सकारात्मक भूमिका साकारायला आवडतं. माझी नवी भूमिका देखिल सकारात्मकच असेल.

सुरू होतेय 'प्रेमाची गोष्ट'

नवी मालिका. सोमवार ४ सप्टेंबरपासून रा. ८:०० वा. Star प्रवाह वर #PremachiGosht #PremachiGoshtOnStarPravah #StarPravah pic.twitter.com/L0txvvrKDw

— Star Pravah (@StarPravah) July 29, 2023

टीव्ही हे माझं आवडतं माध्यम आहे. करोनानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. सोशल मीडियाचं महत्त्वही दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्वच गोष्टी मी पुन्हा एकदा नव्याने अनुभवतेय. प्रेक्षकांचं प्रेम असंच मिळत राहो हीच अपेक्षा. जवळपास १२ वर्षांपूर्वी मी स्टार प्रवाहची ‘तुझं नि माझं घर श्रीमंताचं’ ही मालिका केली होती. काही दिवसांपूर्वी ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. नव्या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे, अशा भावना तेजश्री व्यक्त करते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कचऱ्यापासून थेट १४ मेगावॉट वीज निर्मिती… मोशीत महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

Next Post

मालाडमध्ये सुरू होणार तब्बल एवढे डायलिसिस मशीन… रुग्णांना मोठा दिलासा..

Next Post
unnamed 5

मालाडमध्ये सुरू होणार तब्बल एवढे डायलिसिस मशीन... रुग्णांना मोठा दिलासा..

ताज्या बातम्या

Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011