इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यात काय सुरू आहे, याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. ते कलाकार जर त्यांच्या जवळचे असतील तर कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात अधिकच रस असतो. या आणि अशाच बातम्यांनी मनोरंजन विश्व भरून गेलेले असते. आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तारा सुतारिया आणि आदर जैन यांचे ब्रेकअप झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी ब्रेक अप करण्याचा निर्णय घेतला असून आता त्यांचे मार्ग वेगळे होणार आहेत. या दोघांनीच हा निर्णय घेतला आहे.
या दोघांनी आता एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे नाते संपले की, त्या दोघांमध्ये कायमच तणावपूर्ण संबंध असतात. पण, तारा आणि आदर यांच्याबाबतीत थोडा वेगळा प्रकार आहे. ब्रेक अपनंतरही ते चांगले मित्र म्हणून राहणार असल्याचे समजते. ‘स्टुडण्ट ऑफ द इयर २’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री तारा सुतारीया आदर जैनमुळे चर्चेत येत असते. आदरच्या मोठ्या भावाच्या लग्नात हे दोघे एकत्र दिसले होते. तसेच रणबीर कपूरच्या लग्नात आणि ख्रिसमस पार्टीतही दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर अचानक दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दोघांची ओळख त्याच्या एका कॉमन मित्राद्वारे २०१८ मध्ये झाली होती. त्यानंतर हे दोघे एकत्र वेळ घालवू लागले.
चार वर्षांनी आता हे नाते तुटले आहे. आदर जैनने २०१७ मध्ये ‘कैदी बँड’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. तारा सुतारिया नुकतीच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तारा लवकरच ‘अपूर्व’ चित्रपटात झळकणार आहे.
Lovely! #TaraSutaria pic.twitter.com/tpBSbu2Mh1
— ?Tara Sutaria? Parody Account (@Tarastann) November 26, 2022
Actress Tara Sutaria and Aader Jain Break Up
Divorce Relationship Bollywood