इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात मिल्क ब्युटी म्हणून अभिनेत्री तमन्ना प्रसिद्ध आहे. दाक्षिणात्य चित्रपटात तिने केलेल्या भूमिकांमुळे ती दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणून ओळखली जात असली तरी तमन्नाने बॉलीवूडपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. नंतर ती तेलगू आणि तामिळ चित्रपटांकडे वळली. नुकताच आलेल्या ‘बाहुबली’ या चित्रपटात तमन्नाने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. बॉलीवूडमध्येही अनेक चित्रपटात तिने काम केले आहे. यासोबतच तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असते. आता अशा सौंदर्यवती अभिनेत्रीच्या लग्नाबाबत चाहत्यांना प्रश्न पडला नसेल तरच नवल. त्यांच्यासाठी लवकरच एक चांगली बातमी आहे. तमन्ना लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटिया लग्न करणार आहे. मुंबईतील एका मोठ्या उद्योगपतीसोबत तिचा विवाह होणार आहे. हा लग्नसोहळा मुंबईत पार पडणार असल्याचे सांगितले जातंय. तमन्नाच्या लग्नाची बातमी ऐकून चाहत्यांमध्ये उत्साह दिसतो आहे. लग्नाबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. स्वत: तमन्ना ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत लवकरच शेअर करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले जाते आहे. लग्न झाल्यानंतरही तिच्या करिअरला ब्रेक लागणार नाही. तिचं करिअर ती सुरू ठेवणारच आहे.
तमन्ना लवकरच सुपरस्टार चिरंजीवीसोबत ‘भोला शंकर’ या चित्रपटात दिसणार आहे. मेहर रमेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हिरे व्यापाऱ्याची मुलगी असलेल्या तमन्नाने स्वतःच्या मेहनतीने चित्रपट विश्वात स्वतःचे हक्काचे स्थान निर्माण केले आहे. आजही तमन्ना वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना घेत असलेली मेहनत सहज दिसून येते. यामुळेच तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
Actress Tamannaah Bhatia Wedding Mumbai
Entertainment