मुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू विषयी अनेकांना फारशी माहिती नाही. तब्बूने अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केली आहे. तिचे अनेक चित्रपट यशस्वी झाले आहेत. अनेक वर्षानंतरही तब्बू अद्याप कुमारिकाच आहे. तब्बूने अजून लग्न का केले नाही, हे उत्तर त्याने एका मुलाखतीच्या वेळी दिले.
१९८० पासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणार्या तब्बूने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत विविध प्रकारची व्यक्तिरेखा साकारली आणि ती लोकप्रिय झाली. परिवारात चित्रपटाची पार्श्वभूमी असल्यामुळे तब्बूचा लहानपणापासूनच चित्रपटांकडे कल होता. या कारणामुळे तिने अगदी लहान वयातच चित्रपटांमध्ये प्रवेश घेतला. यानंतर तिने आपल्या अभिनयाची अशी बाजी लावली की प्रत्येकजण त्याकडे पाहतच राहिला. हळू हळू तब्बू तिच्या चित्रपटाच्या प्रवासात पुढे जाऊ लागली.

बॉलिवूडमध्ये बहुचर्चित अभिनेत्री आणण्याचे श्रेय देव आनंद यांना जाते, त्यांनी तब्बूला आपल्या हम नौजवान या चित्रपटात संधी दिली .त्यावेळी तब्बू अवघ्या १४ वर्षांची होती, आणि इतक्या लहान वयातच तिने चित्रपटात बलात्कार पीडितेची भूमिका केली होती.
तब्बूने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. यानंतर तब्बूने पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. तिचे आयुष्यही चढउतारांनी भरलेले होते. वयाच्या या टप्प्यावरही तब्बू अद्याप कुमारिका आहे. सध्या तब्बूचा विवाहीत होण्याचा कोणताही हेतू नाही.
एका मुलाखतीत तब्बूने अविवाहित राहण्याचे मोठे कारण सांगितले. ती म्हणाली की, मी आज अविवाहित आहे, ते फक्त अजय देवगण यांच्यामुळे आहे. तब्बूचा खुलासा जोरदार व धक्कादायक होता. तब्बूने सांगितले की, माझा चुलतभाऊ समीर आर्य आणि अजय देवगण शेजारी राहत होते. त्या दोघांनीही माझ्यावर नजर ठेवून पाठपुरावा केला. त्यानंतर माझ्या आजूबाजूला एखादा मुलगा दिसला तर दोघांनीही त्याला मारहाण केली. म्हणूनच मी आजपर्यंत अविवाहित आहे.










