इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणाने चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आली आहे. यावेळी मुद्दा आहे तिच्या लग्नाचा. आपल्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेल्या फहाद अहमद याच्याशी तिने नुकतंच लग्न केलं आहे. यावरून गदारोळ सुरू आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी लग्न केलं आहे. या दोघांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत विवाह केला. स्वराने स्वतःच्या सोशल मीडियावरून व्हिडिओ शेअर करत स्वतःच आपल्या लग्नाची माहिती दिली. १६ फेब्रुवारीला त्यांनी एंगेजमेंट केली. दोघेही मार्च महिन्यात दिल्लीमध्ये लग्न करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. १९९२ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेला फहाद स्वरापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. आपल्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत असलेली स्वरा स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिद्ध आहे. यासोबतच स्वर कोट्यवधींची मालकीण आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वरा भास्करची संपत्ती जवळपास ४० कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी ती जवळपास ४ ते ५ कोटी रुपये मानधन घेते. चित्रपटांच्या मानधनाव्यतिरिक्त स्वरा सोशल मीडिया आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही बरीच कमाई करते. तिच्याकडे अनेक प्रसिद्ध ब्रॅण्ड्स आहेत. यात तनिष्क ज्वेलरी, फॉर्च्युन रिफाइंड ऑइल आणि स्प्राईट यांचा समावेश आहे. याशिवाय दिल्ली आणि मुंबईत स्वराची घरं आहेत. त्यांची किंमतही कोट्यवधींमध्ये आहे.
स्वरा भास्करला गाड्यांची देखील आवड आहे. तिच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहे. स्वराची सर्वाधिक आवडती गाडी म्हणजे बीएमडब्ल्यू. या गाडीची किंमत सुमारे ४८ लाख रुपये आहे.
https://twitter.com/abufarhanazmi/status/1626220494772117509?s=20
Actress Swara Bhaskar Property Wealth