इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय रिऍलिटी शो. यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत प्रेक्षकांना फारच इंटरेस्ट असतो. सध्या, प्रेक्षक ‘इमली’फेम टीव्ही अभिनेत्री सुंबुल तौकीर हिच्यावर भलतेच नाराज झाले आहेत. ‘बिग बॉस 16 फ्रायडे का वार’मध्ये, सुंबुल तौकीरचे वडील सलमान खानसोबत या कार्यक्रमात आले होते. या शोमध्ये आपल्या मुलीच्या भावनांशी खेळल्याबद्दल शालिन भानोत आणि टीना दत्ता या दोघांना त्यांनी फटकारले. या घटनेने शालीन खूप अस्वस्थ झालेला दिसताच, सुंबुल त्याच्याकडे जाऊन सॉरी म्हणाली. पण सुंबुलचे हे वागणे प्रेक्षकांना अजिबातच आवडले नाही. यावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
लोकांची लाडकी असलेली ही अभिनेत्री ‘बिग बॉस’मध्ये मात्र मागे पडताना दिसते आहे. तिच्या वागण्यामुळे आधीच तिने प्रेक्षकांना दुखावले आहे. वास्तविक, तिचे चाहते तिच्या चांगल्या खेळाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, शालीनच्या नादात ती आपले बेस्ट देत नसल्याची खंत तिच्या चाहत्यांना वाटते आहे. त्यात आता नुकत्याच घडलेल्या घटनेने भर पडली आहे.
सेलिब्रिटी आणि त्यांच्या प्रेमकथा या काही मनोरंजन विश्वाला नवीन नाहीत. आपल्या सेलिब्रिटींचे जोडीदार कोण असावेत यावर अनेकदा चाहत्यांचे काही म्हणणे असते. अशीच परिस्थिती सध्या ‘इमली’फेम टीव्ही अभिनेत्री सुंबुल तौकीर हिच्या बाबतीत निर्माण झाली आहे. सुंबुल तौकीर ‘बिग बॉस १६’ मधील स्पर्धक आहे. सुरूवातीपासूनच सुंबुलच्या नावाची चर्चा सुरू होती. ‘बिग बॉस’ने एक प्रोमो शेअर करत इमली बिग बॉसच्या घरात सहभागी होणार हे स्पष्ट केले होते. त्यात सुंबुलची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. चाहत्यांना सुंबुलकडून चांगल्या गेमच्या अपेक्षा होत्या, पण ‘बिग बॉस’च्या घरात सुंबुल काही खास ठसा उमटवू शकली नाही. त्यामुळे चाहते तिच्यावर नाराज आहेत.
‘बिग बॉस’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला खूप प्रसिद्धी मिळते. तसेच प्रेक्षकही या कार्यक्रमावर प्रचंड प्रेम करतात. ‘बिग बॉस’च्या या घरात नेहमीच कोणाची ना कोणाची लव्हस्टोरी तयार होत असते, याचा अनुभव प्रेक्षकांना अनेकदा आला आहे. त्याचाच प्रत्यय आता येताना दिसतो आहे. बिग बॉसचा हा सीजन सुरू होताच घरात सुंबुलची लव्ह स्टोरी सुरू झाली आहे. शालिनच्या प्रेमात सुंबुल गेमकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. सुंबुलच्या चाहत्यांना ही ‘इमली’ बिग बॉस १६मध्ये तिच्या धडाकेबाज स्टाईलने हंगामा करेल असे वाटले होते. मात्र, सुंबुल सध्या बिग बॉस १६ च्या घरात दोनच काम करत आहे.
एक म्हणजे शालिनच्या मागे पुढे फिरणे आणि सतत रडणे. सुंबुल ज्याप्रमाणे बिग बॉसच्या घरात वागत आहे, त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसलाय. सुंबुलचा सध्यातरी स्वत: चा गेम नाहीये. विशेष म्हणजे शालिनच्या मागे फिरण्यात सुंबुलने स्वत: चा गेम खराब केलाय. तर दुसरीकडे सुंबुलबद्दल शालिनच्या मनात काही विशेष भावना नक्कीच नाहीत. शालिन टीनालाम्हणाला की, मी सुंबुलबद्दल तसा विचार अजिबातच करत नाहीये. सुंबुल आणि शालिनच्या वयात तब्बल २० वर्षांचे अंतर आहे. ‘बिग बॉस’च्या घरात देखील शालिन आणि सुंबुलच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. शालिनसोबतच्या नात्यामुळे सुंबुलचे चाहते नाराज होताना दिसत आहेत.
Actress Sumbul Touqeer Big boss Troll ins Social Media