मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडमध्ये असे अनेक निर्माते दिग्दर्शक व कलाकार आहेत ज्यांचे पहिले लग्न झालेले असतानाही त्यांनी दुसऱ्या तरुणीशी किंवा अभिनेत्रीशी प्रेम प्रकरणानंतर विवाह केला. बॉलीवूडच्या प्रसिद्ध प्रेमकथांचा विचार केला तर बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रेमकथेचा प्रथम उल्लेख येतो. या इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी व सुंदर अभिनेत्री श्रीदेवी चित्रपट निर्माता बोनी कपूर यांच्या प्रेमात पडली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. मात्र, दोघांची प्रेमकहाणी इतकी सोपी नव्हती ही आणखी एक बाब आहे.
अशी झाली प्रेमाची सुरुवात
‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील ‘काते नहीं कट्टे’ या प्रसिद्ध गाण्याच्या शूटिंगदरम्यान बोनी पहिल्या नजरेतच श्रीदेवीच्या प्रेमात पडले. या गाण्याच्या शूटिंग दरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आल्याचे बोलले जात आहे. बोनी कपूर जेव्हा श्रीदेवीच्या प्रेमात पडले, तेव्हा ते मोना शौरी कपूरचे पती होते. एवढेच नाही तर त्यावेळी ते अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर या दोन मुलांचे वडीलही होते.
मोना कपूरची मैत्रीण
बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळात श्रीदेवी बोनी कपूरला तिचा भाऊ म्हणून राखी बांधत असे. त्यानंतर श्रीदेवीच्या मिथुन चक्रवर्तीसोबतच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा श्रीदेवी ही बोनीच्या घरी राहू लागली. त्यानंतर बोनी आणि श्रीदेवी एकमेकांच्या जवळ आले होते. तसेच बोनी कपूरच्या आधी श्रीदेवीची पत्नी मोना कपूरसोबत मैत्री होती.
मोना कपूर मोना कपूर ही बोनी कपूरची पहिली पत्नी असून मोनाबद्दल फार कमी माहिती आहे. काहींना तर ती फक्त गृहिणी होती असेही वाटते. पण मोना एक यशस्वी व्यावसायिक महिला आणि निर्माती देखील होती.
मोनाची प्रतिक्रिया
पहिले लग्न झाल्यानंतरही बोनी कपूर स्वतःला श्रीदेवीच्या प्रेमात पडण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यांनी मुलाखतीत सांगितले की, ‘मी माझ्या माजी पत्नीसमोर कबूल केले होते की, ‘ मी श्रीदेवीच्या प्रेमात पडलो आहे आणि मी स्वतःला थांबवू शकत नाही’. यावेळी कपूर कुटुंबात खळबळ उडाली होती. त्यामुळे मोना आणि अर्जुन कपूरसोबत श्रीदेवीचे नाते फार काळ सामान्य राहू शकले नाही.
मोठा खुलासा
एकदा एका मुलाखतीत मोना हिने बोनी आणि श्रीदेवीच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले , ‘जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी फक्त 19 वर्षांचा होते आणि बोनी माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे होते. त्यानंतर माझा नवरा दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत आहे हे कळणे माझ्यासाठी खूप धक्कादायक होते. आमच्या नात्यात फारशी संधी उरली नव्हती, कारण श्रीदेवी माझ्या पतीच्या मुलाची आई झाली होती.
ब्रेकअप
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांना जान्हवी कपूर व खुशी कपूर या दोन मुली आहेत. तसेच बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी लग्न केल्यानंतर पहिल्या पत्नीशी सर्व संबंध तोडले. अशा परिस्थितीत मोना शौरी कपूरने अर्जुन आणि अंशुला या मुलांना एकटीने वाढवले.