इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या घरात चिमुकल्याचे आगमन झाले आहे. सोनम कपूरने शनिवार, २० ऑगस्ट रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. बऱ्याच दिवसांपासून सोनमच्या प्रेग्नेंसीबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगत होत्या. मात्र, ‘मॉम टू बी’ सोनम आता आई झाली आहे. त्यामुळे, सोनमवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सोनम कपूरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.
सोनम कपूरने असे म्हटले आहे की, आज २० ऑगस्ट २०२२ रोजी आमच्या घरी एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. आमच्या या प्रवासात आमच्यामागे खंबीरपणे उभे असणारे डॉक्टर्स, नर्स, मित्र-परिवार आणि कुटुंबियांचे मी आणि आनंद आम्ही मनापासून आभार मानतो. आमचा नवीन प्रवास आजपासून सुरु झाला आहे. पण, यामुळे आमचं आयुष्य बदललं आहे.”‘या’ अभिनेत्रीने शेअर केली गुड न्यूजसोनम कपूर आई झाली ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर दिग्गज अभिनेत्री नीतू कपूरने शेअर केली आहे.
अभिनेत्री नीतू कपूरने ही पोस्ट शेअर करत सोनम आणि आनंद यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर सोनम कपूरच्या प्रेग्नंसीबद्दल अनेक चर्चा रंगत होत्या. सोनमला मुलगा होणार की मुलगी? याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. चिमुकल्याच्या आगमनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून तसेच जवळच्या मित्र परिवाराकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
Actress Sonam Kapoor Gives Birth to Child
Entertainment Anil Kapoor Bollywood