नाशिक – सोनाली पैठणी या लक्झरी पैठणी आणि साडी ब्रँडने मराठी अभिनेत्री आणि लोकप्रिय सेलिब्रिटी सोनाली कुलकर्णी यांना त्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमले आहे / नियुक्त केले आहे. त्यांनी नाशिकमध्ये त्यांच्या पहिल्या मेगा स्टोअरच्या लाँचसह ऑफलाइन किरकोळ विक्रीसाठी देखील प्रवेश केला आहे,ज्याचे डिझाइन इंट्रार्च असोसिएट्सचे आर्किटेक्ट श्री धनंजय महाले यांनी केले आहे.
मेगास्टोरमध्ये 25 प्रकारच्या केवळ पठाणी साड्यांचे आणि 75 पेक्षा जास्त प्रकारच्या इतर साड्या जसे सिल्क, पटोला, कांजीवरम आणि बनारसी उपलब्ध असतील ज्याची किंमत गुणवत्ता आणि डिझाइननुसार रू 1000 पासून ते 2 लाख+ दरम्यान अशी असणार आहे. सोनाली पैठणी मागणीनुसार सानुकूलित / मागणीनुसार (कस्टमाइज्ड) पैठणी साड्या देखील बनवतात आणि भारतभरातील 50 हून अधिक स्टोअरमध्ये पैठणी साड्यांचे पुरवठादार देखील आहेत. याव्यतिरिक्त, घागरा, ईवनिंग गाउन, वेडिंग आउटफिट्स आणि बरेच काही असे विविध पोशाख या ठिकाणी उपलब्ध असतील.
नाशिकमध्ये मेगास्टोरच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना, श्री.भाऊसाहेब कोखळे, डायरेक्टर, सोनाली पैठणी म्हणाले, “आमच्याकडे पैठणी साड्यांचा तीन दशकांच्या उत्पादनाचा अनुभव आहे आणि ब्रँडला ग्राहकांच्या जवळ नेण्याची ही योग्य वेळ आहे. पारंपारिक पोशाखांचे नेहमीच आपल्या हृदयात विशेष स्थान असते आणि त्याच्याशी एक भावनिक मूल्य जोडलेले असते. सणांचा हंगाम असो किंवा कोणताही विशेष प्रसंग, आपली परंपरा आणि संस्कृती याला साजेशे पोशाख नेहमीच उत्साहवर्धन करतात. नाशिकमध्ये पैठणी साड्यांची जादू आणि सौंदर्य पोहचविण्यात आम्हाला आनंद होत आहे आणि सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत जोडल्या गेल्याचा देखील तितकाच आनंद आहे. तिला महाराष्ट्रात एक आयकॉन मानले जाते आणि महिलांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे कारण। तिचे उत्कृष्ट काम आणि तीची स्वतः ला कॅरि करण्याची पद्धत या मुळे ती सर्वांच्या पसंतीस पडते. समकालीन शैली आणि परंपरा यांच्या सुरेख मिश्रणाचे ती मूर्तीमंत उदाहरण आहे जे आमच्या ब्रँडला देखील अनुरूप आहे. ”
सोनाली कुलकर्णी म्हणाली, “ब्रँडला माझे नाव आहे त्यामुळे या ब्रॅंड सोबत त्वरित कनेक्ट वाटतो ! शिवाय, मला साड्या आवडतात कारण साडीमध्ये जे लालित्य आणि सौन्दर्ययुक्त आकर्षण आहे, ते इतर कोणत्याही पोशाखात नाही. पैठणी साडी महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेचे प्रतिनिधित्व करते आणि सोनाली पैठणीसोबत जोडल्या गेल्याचा मला आनंद होतो आहे कारण ते दीर्घकाळा पासून उत्कृष्ट साड्यांचे निर्माते आहेत. मी उत्साहित आहे आणि या सहकार्यला वृद्धिंगत करण्यावर भर असेल.
ब्रँड आपली मोहीम ‘प्रतीक स्त्री मनी, फक्त सोनाली पैठणी’ सुरू करणार आहे, ज्याचा अर्थ असा आहे की पैठणी साडी ही प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती आहे. या ब्रँडचा उद्देश त्यांच्या उत्कृष्ट दर्जाच्या आणि आकर्षक डिझाईनच्या साड्या अप्रतिम ग्राहक सेवेसह खरेदीकरत्यांपर्यंत पोहचविण्याचा आहे जेणेकरून त्यांना या ब्रॅंडच्या उत्पादनांच्या खरेदीचा अनुभव घेता येईल. मार्केटींगच्या बाबतीत, ब्रँडने महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी सोनाली कुलकर्णीसह एक डिजिटल फिल्म सुरू करण्याची योजना आखली आहे, त्यानंतर इतर बीटीएल आणि ऑनलाइन प्रचारात्मक उपक्रम हाती घेण्यात येतील. जगभरातील विविध भागांतील अनिवासी भारतीय समुदायाकडून पैठणी साड्यांची मागणी होत असल्याने डिजिटल माध्यमावर प्रचार करणे महत्वाचे आहे. स्टोअर व्यतिरिक्त, लवकरच ई-कॉम साइट लाँच करण्यात येणार आहे जेणेकरून ग्राहकांसाठी खरेदी अधिक सोयीस्कर होईल, कारण त्यांचा आवडता ब्रँड फक्त काही क्लिकच्या अंतरावर असेल.
हा साडी ब्रँड प्रगल्भ महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो आणि स्त्रीत्वाचे सार, सौंदर्य आणि सुरेखता या मूल्यांना साजरा करतो. साड्यांमध्ये मयूर, नथनी आणि हस्तनिर्मित जरी काम आणि अद्वितीय रचना बघायला मिळतील, ज्या सोनाली पैठणीच्या स्वत: च्या कारिगरांनी आणि त्यांच्या चमूने तयार केले आहे. सध्याच्या महामारीनंतरची बाजारपेठ आणि आगामी सणासुदीचा हंगाम लक्षात घेता, या वर्षी पुढील दोन तिमाहीत जवळपास पन्नास हजारांच्या वर साड्या विकण्याचे ब्रँडचे लक्ष्य आहे. दीर्घकालीन योजनांमध्ये, जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्याची आणि परदेशी ग्राहकांसाठी सानुकूलित उत्पादने तयार करण्याचा मानस आहे. हे नाशिकमधील पहिले मेगास्टोर आहे, तर भारतातील पैठणीची राजधानी येवला,- नाशिक येथील कारखान्यात उत्पादन घेण्यात येत आहे.