मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – देशातील फिल्म इंडस्ट्री म्हणून आपण बॉलीवूड चित्रपट सृष्टी म्हणून ओळखतो, ती अनेकवेळा वादात सापडली आहे. कधी अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे तर कधी इंडस्ट्रीशी संबंधित व्यक्ती यांच्या वेगळ्या वर्तनामुळे. यापैकी एक प्रकरण बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेशी संबंधित आहे. तेव्हा तिचे कपडे आणि फोटोशूटमुळे ती वादात सापडली होती. एवढेच नाही तर या प्रकरणी परिस्थिती अशी झाली की, तिला तुरुंगातही जावे लागले होते.
बॉलीवूडशी संबंधित काही कलाकार त्यांच्या चित्रपटांमधून मनोरंजन करतात, तर काही त्यांच्या फोटोशूट आणि लूकमुळे चर्चेत राहतात. सन 1998 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेसोबत असेच काहीसे घडले होते. सोनाली बेंद्रेने एका मासिकासाठी कव्हर फोटोशूट केले आणि ते प्रकाशित झाल्यावर देशभरात खळबळ उडाली होती.
सदर प्रकरण मार्च 1998 ची आहे, त्यावेळी शो टाइम नावाची पत्रिका यायची. अभिनेत्री सोनाली बेंद्रेने या मासिकासाठी कव्हर फोटोशूट केले आहे. या शूटसाठी सोनालीने ड्रेस डिझायनर अॅशले चार्ल्स रेबेलोने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. तो पिवळ्या रंगाचा शॉर्ट कुर्ता होता. त्यावर सर्वत्र ‘ओम नमः शिवाय’ अशी अक्षरे छापली होती. सदर मासिक प्रकाशित होताच काही लोकांनी सोनाली बेंद्रे विरोधात तक्रार दाखल केली.
दरम्यान, या प्रकरणात नागरिकांनी सोनालीचा फोटो आक्षेपार्ह असल्याची तक्रार केली आणि या फोटोमुळे तिच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. त्यानंतर सोनालीसह अन्य तिघांवर अश्लील चाळे केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर दि. 27 मार्च 2001 रोजी सोनाली, फोटोग्राफर अमित कुमार आशर आणि ड्रेस डिझायनर अॅशले चार्ल्स रेबेलो यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आणखी एक आरोपी नीलकंठ गिरी हा मासिकाचा प्रकाशक होता.
तसेच धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी सोनालीसह छायाचित्रकार आणि ड्रेस डिझायनरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयात सुनावणी असल्याने सोनाली नियोजित तारखेला हजर न झाल्याने तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. मात्र, नंतर पोलीस ठाण्यात जाऊन ती दोन दिवस न्यायालयात हजर राहिली आणि नंतर 12 हजार रुपयांची नाममात्र रक्कम भरल्यानंतर जामिनावर सुटका झाली. त्यानंतर काही काळानंतर त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली.