मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काहीतरी वेगळंच वाटलं ना वाचून? पण होय, हे खरं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी – बेनोडेकर हिने खरंच तिच्या लग्नाचं आमंत्रण तिच्या सर्व चाहत्यांना दिलं आहे. सामान्यपणे आपल्या आवडत्या कलाकारांचा विवाह सोहोळा हा चाहत्यांसाठी अत्यंत उत्सुकतेचा विषय असतो. पण ते स्वप्नं काही नेहमीच पूर्ण होताना दिसत नाही. पण मराठी चित्रपटसृष्टीत ‘अप्सरा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनालीने मात्र चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करण्याचे मनावर घेतले आहे.
कोरोना काळात अनेक निर्बंध असल्याने तिने कुणाल बेनोडेकर सोबत कोर्टात लग्न केले. पण त्यावेळी कसलीच हौसमौज करता न आल्याने यंदा मे महिन्यात पुन्हा तिने लग्न केले. या संदर्भात एक पोस्ट देखील तिने सोशल मीडियावर प्रसिद्ध केली होती. त्यांचा हा शाही विवाह सोहोळा आता प्रेक्षकांना देखील पाहायला मिळणार आहे. ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी माध्यमातून प्रेक्षक तो पाहू शकतात. कुणालच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर करत सोनालीनेच ही माहिती चाहत्यांना दिली आहे. आणि त्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देखील तिने चाहत्यांना दिले आहे. 11 ऑगस्ट रोजी हा विवाह सोहोळा प्रेक्षकांना पाहता येईल.
https://twitter.com/meSonalee/status/1555908854210330625?s=20&t=O8oUIPRq-nfNtjSJ35ypeQ
एखाद्या मराठी कलाकाराचे लग्न अशाप्रकारे प्रक्षेपण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. लंडनमध्ये पार पडलेला संपूर्ण सोहोळा, वऱ्हाडीची लगबग, लग्नातील विधी या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळतील. सोनाली सांगते, अशाप्रकारे एखाद्या मराठी अभिनेत्रीचा लग्नसोहोळा प्रसारित करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. ज्यांना माझ्या लग्नाला उपस्थित राहता आले नाही त्यांना तसेच माझ्या चाहत्यांना माझ्या आयुष्यातील हा सगळ्याच आनंदाचा क्षण अनुभवता येईल.
https://twitter.com/meSonalee/status/1555175576356413446?s=20&t=O8oUIPRq-nfNtjSJ35ypeQ
Actress Sonalee Kulkarni Wedding Invitation
Entertainment OTT Planet Marathi