इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री श्वेता तिवारीने भोपाळ येथील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे तिच्यावर जोरदार टीकेची झोड उठली आहे. तसेच, तिच्या विधानाची दखल घेत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
श्वेता तिवारी ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. भोपाळ मध्ये प्रमोशनचा एक कार्यक्रम होता. त्यावेळी ती म्हणाली की, “माझ्या ब्राची साईज ही देव घेऊन जातोय.” हे उत्तर देत असताना ती खळखळून हसताना दिसत आहे. तिच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचे हे विधान अतिशय गंभीर असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. त्यामुळेच तिला सध्या ट्रोलही केले जात आहे.
बघा ती काय म्हणाली याचा व्हिडिओ
https://twitter.com/Deepsingh_page3/status/1486411319293411328?s=20
मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा म्हणाले की, अभिनेत्री श्वेता तिवारी हिचे विधान निंदनीय आहे. याप्रकरणी २४ तासाच्या आत चौकशी अहवाल देण्याचे आदेश भोपाळचे पोलिस आयुक्त मकरंद देऊस्कर यांना दिले आहेत. हा अहवाल आल्यानंतर काय कारवाई करायची, याचा निर्णय केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/drnarottammisra/status/1486579303097634818?s=20