इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री श्वेता तिवारीने भोपाळ येथील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले. त्यामुळे तिच्यावर जोरदार टीकेची झोड उठली. “माझ्या ब्राची साईज ही देव घेऊन जातोय.” असे वक्तव्य तिने केले होते. याप्रकरणी अखेर श्वेताने स्पष्टीकरण दिले आहे. जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते, असे तिने म्हटले आहे. तसेच, माझी देवावर श्रद्धा आहे. माझ्या एका सहकाऱ्याशी संबंधित विधानाचा हवाला मी देत होते. मात्र, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. चुकीचा अर्थ लावला गेला. सर्वांनी हे लक्षात घ्यावे की, सौरभ राज जैन यांनी साकारलेल्या देवाच्या लोकप्रिय पात्रासाठी मी भगवान हा शब्द वापरला होता. एखाद्या अभिनेत्याचे नाव त्याच्या पात्राशी जोडले जाते. अशा वेळी मी हेच नाव उदाहरण म्हणून वापरले. असे श्वेताने स्पष्ट केले.
श्वेता तिवारी ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. भोपाळ मध्ये प्रमोशनचा एक कार्यक्रम होता. त्यावेळी ती म्हणाली की, “माझ्या ब्राची साईज ही देव घेऊन जातोय.” हे उत्तर देत असताना ती खळखळून हसताना दिसत आहे. तिच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचे हे विधान अतिशय गंभीर असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. त्यामुळेच तिला सध्या ट्रोलही केले जात आहे.
बघा ती काय म्हणाली याचा व्हिडिओ
https://twitter.com/Deepsingh_page3/status/1486411319293411328?s=20