इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडची क्रेझ साऱ्यांनाच असते. अनेकदा तर कलाकार बाल कलाकार म्हणून या क्षेत्रात येतात. आणि मग प्रथितयश कलाकार म्हणून नावारूपाला येतात. तर काहीजण परिस्थिती म्हणून लहान वयात कामाला सुरुवात करतात. अशाप्रकारे काम करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा समावेश होतो. अर्थात तिची सुरुवात अभिनय क्षेत्रातून झाली नाही. तर ट्रॅव्हल एजन्सीमधून तिच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर तिने अभिनयाची वाट निवडली. श्वेता आतापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे.
खरे तर अभिनेत्री श्वेता तिवारी हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. आतापर्यंत ती अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे. ती उत्तम कलाकार असल्याचे तिने अनेकदा सिद्ध केले आहे. खरे तर माणूस म्हणूनही ती वैयक्तिक जीवनात अत्यंत खंबीर आहे. याचे कारण व्यावसायिक जीवनातील संघर्षाव्यतिरिक्त, श्वेताने तिच्या वैयक्तिक आयुष्यातही बरेच चढ-उतार पाहिले आहेत.
श्वेता तिवारीने अगदी लहान वयातच काम करायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी ती एका ट्रॅव्हल एजन्सीत काम करायची. या कामासाठी तिला मानधनापोटी अवघे ५०० रुपये मिळायचे. अभिनेत्री होण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले होते. त्यासाठी तिने कठोर मेहनत केली अखेरीस तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले.
मानधन म्हणून मिळणाऱ्या ५०० रुपयांमधून श्वेताने शाळेची फी जमा केली. फार लहान वयातच पैसे कमवायला सुरुवात केल्याने मिळणाऱ्या पैशातून आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करण्याची तिला सवय होती. कधीकाळी अवघे ५०० रुपये कमावणारी श्वेता आजघडीला टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती जवळपास ६० ते ७० हजार रुपये एवढे मानधन घेते. वयाच्या १६ व्या वर्षी श्वेता पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली. एका जाहिरातीसाठी तिचे कास्टिंग करण्यात आले होते.
‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून श्वेता तिवारीला घराघरांत ओळख मिळाली. असे असले तरी तिने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘कलीरें’ या मालिकेतून केली होती. यातून फार प्रसिद्धी मिळाली नाही. नंतर ती ‘आनेवाला पल’ आणि ‘कहीं किसी रोज’ या मालिकांमध्ये झळकली. त्यानंतर श्वेताने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारली. या भूमिकेचे लोकांनी फारच कौतुक केले.
श्वेता तिवारीचे वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी श्वेताने तिचा दुसरा पती अभिनव याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी पोलिसांनी अभिनवला अटक केली होती. मात्र, हे आरोप खोटे असल्याचे अभिनवचे म्हणणे होते. सध्या श्वेता आणि अभिनव वेगळे राहत आहेत. अभिनवच्या आधी श्वेता तिवारीचे लग्न राजा चौधरीसोबत झाले होते. नव्या नवेलीची काही वर्षे चांगली गेली. पण नंतर दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. श्वेता तिवारीने राजाविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. १४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. आता श्वेता तिवारी आपल्या मुलांसोबत वेगळी राहते.
Actress Shweta Tiwari Career Life Journey
Television Entertainment