इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘कसौटी जिंदगी की’ मालिका घराघरात आवर्जून पाहिली जायची. या मालिकेमधून अभिनेत्री श्वेता तिवारीला प्रसिद्धी मिळाली. यानंतर ‘सोनी’वरील ‘मारे डॅड की दुल्हन’ कार्यक्रमात श्वेता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली. वयाची चाळीशी पार केलेल्या श्वेता तिवारीने स्वतःला आजवर फिट ठेवलं आहे. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. अलीकडेच चर्चेत आलेल्या ‘बेशरम रंग’ गाण्यावर श्वेता तिवारीने आपल्या अदाकारीचा तडका लावला आहे. याच गाण्यावर श्वेताने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
श्वेता तिवारीने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती बाथरोब घालून ‘बेशरम रंग’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. एकीकडे अनेक अभिनेत्रींनी या गाण्यावर दीपिकासारखाच डान्स व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तर दुसरीकडे श्वेताने मात्र या डान्सला हटके ट्वीस्ट दिला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये श्वेता तिवारी बाथरोब घालून ‘बेशरम रंग’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. डान्स करता करता ती बाथरुममध्ये जाते आणि नंतर पिवळ्या रंगाचा स्टायलिश पँट-सूट घालून बाथरुममधून बाहेर पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना श्वेताने लिहिलं, “जेव्हा तो मला हजार वेळा विचारतो की तयार व्हायला किती वेळ लागणार आहे. तेव्हा मी काहीशी अशी तयार होऊन बाहेर पडते.” या व्हिडीओमध्ये श्वेताचा हटके आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या गाण्याच्या व्हिडिओवर श्वेता तिवारीच्या चाहत्यांनी हटके कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, तुमच्यामुळे तुमच्या मुलीचे फॉलोअर वाढत नाहीत, तर अनेकांनी श्वेता यात खूप सुंदर दिसत असल्याचे म्हटले आहे. श्वेता तिवारीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती ‘अपराजिता’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. श्वेताची ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. तर दुसरीकडे श्वेताची मुलगी पलकही सलमान खानला त्याच्या आगामी चित्रपटासाठी असिस्ट करत आहे. दीपिका पदुकोणच्या ‘बेशरम रंग’‘पठाण’ चित्रपटातील हे गाणं दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे चर्चेत आलं होतं. शाहरुख आणि दीपिकाच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
Actress Shweta Tiwari Besharam Song Bathroom Video Viral