मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या संदर्भातील एक मेसेज सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. यासंदर्भात गोखले यांनीच मोठा खुलासा केला आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. माझे अकाऊंट पुन्हा एकदा हॅक झाले आहे. फेसबुक मेसेंजरवर एक मेसेज व्हायरल झाला आहे. त्यात एक लिंक पाठवली आहे. ती ओपन केली तर तुमच्या प्रोफाईलवरुन इतरांना मेसेज जातील. ती एक व्हायरस लिंक आहे. त्यामुळे सावधान. या ट्रॅपमध्ये अडकू नका, असे आवाहन गोखले यांनी केले आहे. बघा त्यांची ही फेसबुक पोस्ट
https://www.facebook.com/shubhangi.gokhale.18/posts/10226775026751720