सिद्धी दाभाडे, नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
मराठी टीव्ही सिरीयल्समधील दोन मित्र आता लग्नबंधनात अडकणार आहेत. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे असी त्यांची नावे आहेत. शिवानीने विराजस सोबतचा एक फोटो सोशल मिडियात शेअर करुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. अद्याप या दोघांचा साखरपुडा झालेला नाही. तो लवकरच होणार आहे.
मराठी फेम आणि ‘माझा होशील ना’ या मालेकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी अखेर त्यांचे नाते बदलण्याचे ठरविले आहे. शिवानीने नुकताच तिचा आणि विराजसचा फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. त्यात ती तिच्या बोटातील अंगठी दाखवत आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, ’अंगठी घातली..’. तसेच तिने #virani(विरानी) हा hashtag सुद्धा वापरला आहे. त्याचबरोबर हा फोटो विराजसची आई आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सुद्धा आपल्या सोशल मेडियावर शेअर केला आहे. ‘या वर्षी मैत्री नात्यात बदलणार’ असं मृणाल यांनी पोस्टमध्ये लिहीले आहे. मराठी मालिका इंडस्ट्रीतील या जोडप्याचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
https://www.facebook.com/100004759422961/posts/2142624032572890/
शिवानी रांगोळे, सिद्धार्थ चांदेकर विरुद्ध ‘सांग तू आहेस का’ या टीव्ही शो मध्ये दिसली होती. तर दुसरीकडे, विराजस कुलकर्णी हा ‘माझा होशील ना’ या टीव्ही शो मध्ये गौतमी देशपांडे सोबत दिसला होता. विराजस फक्त अभिनेता नसून तो एक दिग्दर्शक सुद्धा आहे. विराजसने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रदार्पण केले आहे. ’थेटर ऑन एंटरटेनमेंट’ ही विराजसची निर्मिती संस्था आहे. तर ‘बनमस्का’ मालिकेमुळे शिवानी रांगोळे हे नाव प्रसिद्ध झाले. ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ या विराजसच्या नाटकात शिवानीने अभिनय केला होता. तेव्हाच त्यांची ओळख झाली. दोघांनी एकमेकासोबत चांगली मैत्री केली आणि आता त्याचे रुपांतर प्रेमात झाले आहे.