इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बहुतेक सर्वच वाहिन्यांवर विनोदी कार्यक्रम असतात, आणि त्याला चाहतेही खूप असतात. मराठी वाहिन्यांवरील काही विनोदी कार्यक्रमांना तर विशेष प्रतिसाद मिळतो. त्यातीलच एक म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्यातील सर्वच कलाकार प्रसिद्ध झाले. शिवाली परब ही त्यातीलच एक. शिवाली सोशल मीडियावर सक्रिय असून नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यातील एका वाक्यावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हास्यजत्रेमुळे शिवालीच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. नवीन प्रोजेक्टबद्दल शिवाली तिच्या चाहत्यांना माहिती देत असते.
अनेकदा ती फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना दिसते. शिवालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. शिवालीने हास्यजत्रेच्या टीमबरोबर एक व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये ती “किती दिवस बनून राहू तुझी मी पाहुणी, घरी येऊन घाल मला लग्नाची मागणी”, असं म्हणते आहे. सोनी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शिवालीच्या या मजेशीर व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
शिवाली एक उत्तम अभिनेत्री आहे. हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळवलेल्या शिवालीने चित्रपटांतही काम केलं आहे. ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील तिने दिलेल्या किसींग सीनचीही चर्चा रंगली होती.
Actress Shivali Parab Video Viral Social Media