इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्व हे जेवढे मनोरंजक आणि आकर्षक वाटते तेवढेच ते आतून अत्यंत पोखरलेले आहे. सततचे ताण तणाव, कलाकारांना वैयक्तिक आयुष्य नसणं, स्पर्धेत टिकून राहण्याचं टेन्शन, अशा अनेक गोष्टी या त्याच्या आड असतात. गुन्हेगारी तर विचारायची सोय नाही, अशी परिस्थिती आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. नवरा राज कुंद्रा याचे गुन्हे, पॉर्न फिल्मवरून त्याला झालेला तुरुंगवास यामुळे ती चर्चेत होतीच.
सध्या मात्र, शिल्पाविरोधातीलच एक खटला चर्चेत आहे. हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेर याने २००७ मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात घेतलेल्या चुंबनप्रकरणी शिल्पा शेट्टीवर तक्रार दाखल होत कायदेशीर कारवाई झाली होती. यानंतर सुरू असलेला खटला रद्द करण्यात यावा, यासाठी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने उच्च न्यायालयात धाव घेतली. शिल्पावर अश्लीलता व असभ्यतेचा आरोप करण्यात आला होता. दोनपैकी एका गुन्ह्यातून दंडाधिकाऱ्यांनी शिल्पाला दोषमुक्त केले. मात्र, एका गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यास नकार दिला.
२००७ साली दिल्लीतील एका कार्यक्रमात शिल्पा शेट्टी आणि हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेर हे एका कार्यक्रमात एकत्र होते. तेव्हा गेर याने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा विनयभंग केला होता. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकाराने भोपाळ, इंदूर, जयपूर, मुंबई आणि दिल्ली व्यतिरिक्त कानपूर, गाझियाबाद आणि वाराणसी येथे अश्लीलतेचे कारण पुढे करत शेट्टी आणि गेर यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. एका अहवालानुसार सर्वोच्च न्यायालयाने सर्व कार्यवाहीला स्थगिती दिली. तथापि, हे प्रकरण सहा वर्षांनंतर २०१७ मध्ये न्यायालयात पोहोचले.
शेवटी, जानेवारी २०२२ मध्ये, उच्च न्यायालयाने शेट्टीला एका तक्रारीत आरोपमुक्त केले, दुसऱ्या प्रकरणात दोषमुक्ततेची तरतूद नसल्याचे कारण दंडाधिकाऱ्यांनी दिले. या निर्णयाला शिल्पाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिल्पाचे वकील मधुकर दळवी यांनी न्या. आर. जी. अवचट यांच्या एकलपीठापुढे युक्तिवाद केला. दळवी यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारसह जयपूर येथील तक्रारदार पूनमचंद भंडारी यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
https://twitter.com/TheShilpaShetty/status/1602202348000280578?s=20&t=_1m1VT84qw5rGor4Mvf0DQ
Actress Shilpa Shetty in High court on Kissing Case