शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती तथा उद्योजक राज कुंद्रा यांनी सध्या देवदर्शनाचा धडाका लावला आहे. यापूर्वी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गड येथे देवी सप्तशृंगी आणि त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर हे दाम्पत्य शिर्डी येथे आले. येथे त्यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. यासंदर्भात शिल्पा शेट्टीनेच इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करुन माहिती दिली आहे.
https://twitter.com/TheShilpaShetty/status/1478685195448451072?s=20
शिल्पा शेट्टी झाली ट्रोल
कोरोनाच्या निर्बंधांमुळे शिर्डीतील साई बाबांच्या मंदिरात दर्शनासाठी नियम बनविण्यात आले आहेत. असे असताना शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याची परवानगी कशी मिळाली, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. शिल्पाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक नेटकरी टीकाटीपण्णी करीत आहेत. सध्या राज कुंद्रा याची जामीनावर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. पोर्नोग्राफी (अश्लिल चित्रपट) निर्मिती प्रकरणात राज याच्यावर गुन्हा दाखल आहे. अनेक दिवस तो तुरुंगात होता. याचा संदर्भ देत अनेक जणांनी शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्यावर टीका केली आहे.