मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण शिबानी दांडेकरसोबत नुकतेच लग्न केले. दोघांच्या लग्नाला कुटुंबीयांव्यतिरिक्त दोघांचे जवळचे मित्रही पोहोचले होते. या दोघांच्या लग्नसोहळ्याला काही मित्रांनी हजेरी लावत त्यांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर काही मित्रांनी फरहान आणि शिबानीला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा दिल्या. पण त्यांच्या लग्नाच्या बातम्यां दरम्यान लक्ष वेधून घेतलेली बातमी म्हणजे गौहर खान आणि शिबानी दांडेकर यांच्यातील भांडण होय, एका रिपोर्ट्सनुसार, या दोघांमधील वादाचे कारण दुसरे कोणी नसून शिबानी दांडेकरचा पती आणि अभिनेता फरहान अख्तर होता. शिबानी आणि गौहर यांच्यातील भांडणाच्या बातम्यांबाबत काही वेगळया गोष्टी समोर आल्या होत्या, ज्याबद्दल गौहर खानने आता ट्विट करून आपला राग व्यक्त केला आहे. गौहर खानने ट्विट करत या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.
कारण अनेक रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले होते की, गौहर खान ही फरहान अख्तरवर क्रश होती आणि शो दरम्यान फरहानबद्दल तिच्या आणि शिबानीमध्ये अनेकदा तू-तू, मैं-मैं होते. यावर आता गौहर खानने मौन तोडत प्रतिक्रिया दिली आहे. गौहर खानने ट्विट करत लिहिले की, ‘अरे देवा, काही लोक खरोखर मजेदार आणि घाणेरडे आहात. तसेच गौहर खान म्हणाली त्यांना लाज वाटली पाहिजे. तसेच तिचा राग व्यक्त करताना गौहर खानने आणखी पुढे लिहिले की, आम्ही एकत्र एक शो केला होता, ज्यामध्ये मी म्हटले होते की, त्यावेळी सर्वच स्पर्धक फरहान अख्तरवर क्रश होते. गौहरने पुढे लिहिले की, ‘फरहान अख्तर आमचा होस्ट होता. मी त्या दोघांसाठी खूप आनंदी आहे की, त्यांनी लग्न केले आणि ते एकत्र आहेत. परंतु चांगल्या आणि सुंदर क्षणातही आता तुम्ही असे चुकीचे काम करता, ते खूप वाईट आणि अयोग्य आहे. कृपया त्यांना त्यांच्या आनंदाच्या क्षणांचा आनंद लुटू द्या. तसेच यावर गौहर खानचा राग शांत झाला नाही.
https://twitter.com/GAUAHAR_KHAN/status/1498144941209690115?s=20&t=fpeTmyVqIWU_dVxmmydCxg
त्यांनी ट्विट करताना पुढे लिहिले की, मला आश्चर्य वाटते की, युद्ध सुरू असताना लोक मरत आहेत, काही लोकांकडे जगण्यासाठी काहीच उरले नाही. सर्वत्र द्वेष पसरत आहे. अशा स्थितीत काही माध्यमे खोटेपणा पसरवण्यापासून थांबत नाहीत. आयुष्य स्वतःसाठी जगण्यास योग्य बनवा’ वास्तविक गौहर खान आणि शिबानी दांडेकर यांनी ‘आय कॅन डू दॅट’ या रिअॅलिटी शोमध्ये काम केले होते. हा शो फरहान अख्तरने होस्ट केला होता. फरहान अख्तर त्यावेळी मुलींचा क्रश असायचा. हा शो झी टीव्हीवर २०१५ मध्ये प्रसारित झाला होता. आता शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांनी सुमारे ४ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.