इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात कधी काय घडेल हे काही सांगता येत नाही. या क्षेत्रातील कलाकार त्यांच्या स्वतःच्या जगात जगत असतात. त्यांचे स्वतःचे असे मूड्स असतात. त्यामुळेच येथील कलाकार कधी काय वागतील याचा अंदाजच येत नाही. अर्थात, आपल्या भूमिकांशिवाय कलाकारांना स्वतःचे वैयक्तिक आयुष्य असते. त्यातही त्यांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. अलीकडेच अभिनेत्री शमिता शेट्टी हिला एक अनुभव आला. तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती पार्टीतून बाहेर पडत होती, पण अचानक तिच्या सोबत असलेल्या अभिनेता अमीरने केलेल्या कृतीमुळे शमिता घाबरली.
बॉलिवूड अभिनेत्री आणि शिल्पा शेट्टी हिची बहीण असलेली शामिता शेट्टी हिने मोजक्याच चित्रपटातून अभिनय केला आहे. मात्र ती मनोरंजन विश्वात आपली विशेष छाप पाडू शकली नाही. अभिनेता राकेश बापट बरोबरच्या प्रेम प्रकरणामुळे ती चर्चेत आली होती. नुकतीच ती एका पार्टीत दिसली. ज्यामध्ये ती पार्टीतून बाहेर पडत होती. तेव्हाच अचानक टीव्ही अभिनेता आमिर अलीने तिला आपल्या मिठीत घेतले आणि फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यांपासून वाचवत तिला तिच्या गाडीपर्यंत नेले. आमिरला अचानक पाहून शमिताही थोडी घाबरली.
शमिताला कारमध्ये बसवल्यानंतर आमिरने तिचा निरोप घेतला. शमिता शेट्टीच्या या व्हिडिओवर लोक कमेंट करत आहेत.
काही लोकांना आमिरचे हे वागणे थोडे विचित्र वाटले आणि त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एकाने लिहले आहे “हिला खूप ऍटिट्यूड आहे” तर दुसऱ्याने लिहले आहे “यांचे काहीही चालू असते.” तर आणखीन एकाने लिहिले आहे “यांना काहीच वाटत नाही का?” अशा शब्दात लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Actress Shamita Shetty Video Viral Social Impact