इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्व हे अत्यंत ग्लॅमरस जग आहे. यात कास्टींग काऊच सारखे घृणास्पद प्रकार नेहमीच होताना दिसतात. अनेक अभिनेत्रींनी अशा प्रकारांबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. मध्यंतरी ‘मी टू’ सारख्या चळवळीमुळे या प्रकाराला चपराक बसली होती. आता पुन्हा हा प्रकार समोर आला आहे. अभिनेत्री शमा सिकंदरने यावर भाष्य केलं आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्मात्यांनी तिला कशाप्रकारे वागणूक दिली त्याचा धक्कादायक अनुभव सांगत कास्टींग काऊचचा प्रकार तिने पुन्हा उजेडात आणला आहे.
एका मुलाखतीमध्ये शमा कास्टिंग काऊचबाबात बोलत होती. ती म्हणाली, “काही निर्मात्यांनी माझ्याशी चुकीच्या पद्धतीने मैत्री करण्याचा प्रयत्न केला. जर आपण एकत्र कामच करत नाही तर मैत्री कशी करू शकतो असा विचार मी करायचे. कामाच्या मोबदल्यामध्ये सेक्स हा एकच त्यांचा उद्देश असल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. कास्टिंग काउच फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर सगळीकडे होत आहे.’ आजचे निर्माते खूप बदलले आहेत, असे या अभिनेत्रीचे मत आहे.
https://twitter.com/shamasikander/status/1566649507768455168?s=20&t=UrOHypLbToA5RifhY4k3cw
शमा म्हणते की, तरुण निर्माते खूप व्यावसायिक आहेत. ते इतर लोकांनाही खूप आदराने वागवतात. कामाच्या बदल्यात सेक्सची मागणी ते करत नाहीत, असे म्हणत शमाने नव्या पिढीतील निर्मात्यांचं कौतुक केलं. यासह नव्या पिढीतील निर्मात्यांची विचार करण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे असं शमाचं म्हणणं आहे. शमाने ‘मन’ चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तसेच टीव्ही मालिका, वेबसीरिजमध्ये तिने काम केलं आहे. ‘बालवीर’ या मालिकेमध्ये ती सध्या काम करत आहे.
https://twitter.com/shamasikander/status/1568828277384708100?s=20&t=UrOHypLbToA5RifhY4k3cw
Actress Shama Sikander Casting Couch Sex Film Industry
Bollywood Producer