इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी असलेली सारा अली खान अल्पावधीतच लोकप्रिय झालेली आहे. आई – वडिलांच्या यशस्वी करिअरची पार्श्वभूमी असली तरी तिने स्वतःचे स्थान स्वतः निर्माण केले आहे. तिचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. अशी ही सारा अली खान सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते. सध्या तिच्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आहे.
साराच्या पोस्टमध्ये काय?
सारा अली खाननं तिच्या ‘ऐ वतन मेरे वतन’ या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच संपवलं आहे. चित्रीकरण संपवताच थोडा ब्रेक घेत सारा अली खान तिच्या कुटुंबासोबत ट्रिपसाठी गेली आहे. सारानं सोशल मीडियावर तिच्या या ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत सारानं कश्मीरची सुंदरता देखील आपल्याला दाखवली आहे. यावेळी तिच्यासोबत काही मित्र-मैत्रिणी देखील आहेत. त्यांचे फोटो देखील समोर आले आहेत. यात सगळ्यांचे लक्ष सारानं शेअर केलेल्या एका फोटोतील मिस्ट्री मॅननं वेधलं आहे. गंमत म्हणजे, काही दिवसांपूर्वीच सारा अली खान क्रिकेटर शुबमन गिलला डेट करते आहे अशा बातम्या आल्या होत्या. आता सारासोबत स्विमिंग पूलमध्ये असलेला हा मिस्ट्री मॅन कोण? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
नेटकऱ्यांचा साराला प्रश्न
सारासोबत असलेला हा मुलगा नेमका कोण आहे? या चर्चांना उधाण आलं आहे. सारासोबतच्या या मुलाने चष्मा लावला आहे. तो सारासोबत स्विमिंग पूलमध्ये उतरला आहे आणि दोघंही हसत गप्पा मारत असल्याचा हा फोटो आहे. ही व्यक्ती, हा मिस्ट्री मॅन कोण? याबाबत नेटकरी प्रश्न विचारत आहेत.
एका अकाऊंटवरून साराला थेट प्रश्न विचारण्यात आला आहे की तू कुठल्या क्रिकेटरला डेट करते आहेस का? तर सारा तू शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाचव्या फोटोत कोण आहे? असा प्रश्न प्रियंक नावाच्या नेटकऱ्याने विचारला आहे. हा साराचा मित्र असून त्याचं नाव जेहान हांडा असे आहे. तो एक लेखक आहे. सारानं शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. सारानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची आई आणि अभिनेत्री अमृता सिंगही दिसत आहे.
Actress Sara Ali Khan Swimming Pool Unknown Boy